ETV Bharat / state

Leopard Hunt a Dog : पाळीव श्वानाला वाचविण्यासाठी मालकाने केला बिबट्याचा पाठलाग, थरार सीसीटीव्हीत कैद - CCTV

जुन्नर तालुक्यातील काळवाडी येथे पाळीव श्वानाला बिबट्याच्या तावडीतून वाचविण्यासाठी मालकाने थेट बिबट्याचा पाठलाग केला. हा थरार सीसीटीव्हीत ही कैद झाला आहे. मदन काकडे, असे धाडसी मालकाचे नाव आहे. दुर्दैवाने मालक स्वतःच्या श्वान वाचवू शकले नाहीत. हा प्रकार मंगळवारी (दि. 17 मे) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडला ( Leopard Hunt a Dog ) आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : May 17, 2022, 6:45 PM IST

Updated : May 17, 2022, 9:16 PM IST

पुणे - पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील काळवाडी येथे पाळीव श्वानाला बिबट्याच्या तावडीतून वाचविण्यासाठी मालकाने थेट बिबट्याचा पाठलाग केला. हा थरार सीसीटीव्हीत ही कैद झाला आहे. मदन काकडे, असे धाडसी मालकाचे नाव आहे. दुर्दैवाने मालक स्वतःच्या श्वान वाचवू शकले नाहीत. हा प्रकार मंगळवारी (दि. 17 मे) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडला ( Leopard Hunt a Dog ) आहे.

सीसीटीव्ही

आजूबाजूला शेती असलेल्या ठिकाणी मदन काकडे यांचे निवासस्थान आहे. त्यांच्याकडे सहा वर्षांपासून पाळलेला राजा नावाचा श्वान आहे. पहाटे अचानक उसातून दबक्या पावलाने बिबट्याने घराच्या अंगणात प्रवेश केला. श्वानाची व बिबट्याची नजरानजर होताच त्यांच्यात झटापट सुरू झाली. बिबट्याने श्वानाची मान जबड्यात पकडून धरली. ओरडण्याचा आवाज ऐकून मदन काकडे धावत घराबाहेर आले. कशाचीही पर्वा न करता त्यांनी श्वानाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. बिबट्याने श्वानाला घेऊन ऊसात पळ काढला. काकडे त्याच्यामागे धावत गेले. मात्र, बिबट्याने चपळाई दाखवत धूम ठोकली. त्यामुळे त्यांच्या लाडक्या राजाचा जीव ते वाचवू शकले नाही. हे थरारनाट्य घराबाहेरील सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

या श्वानावर बिबट्याने केलेला तिसरा हल्ला होता. खबरदारी म्हणून काकडे परिवाराने कुत्र्याच्या गळ्यात खिळ्यांचा पट्टा लावला होता. मात्र, तरीही बिबट्याने शिकार केलीच. काकडे यांच्याकडे आधी असलेल्या श्वानाचाही अशाचप्रकारे बिबट्याच्या हल्ल्याने मृत्यू झाला होता.

हेही वाचा - Gyanvapi Shringar Gauri Case : ज्ञानवापी मशिदीमध्ये सापडलेले शिवलिंग नसून फुटलेले कारंजे- वकिलाचा दावा

Last Updated : May 17, 2022, 9:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.