ETV Bharat / state

भुशी डॅम परिसरात नियमांची पायमल्ली, ४० पर्यटकांवर गुन्हे दाखल

पुणे जिल्ह्यातील कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनाला बंदी घातली आहे. मात्र, काही हौशी पर्यटक नियमांची पायामल्ली करून पर्यटनास जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा पर्यटकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

लोणावळा पोलीस
लोणावळा पोलीस
author img

By

Published : Jul 12, 2020, 5:42 PM IST

पुणे - लोणावळ्याच्या भुशी धरण परिसरात नियमांची पायमल्ली करून आलेल्या मुंबई येथील ४० पर्यटकांवर लोणावळा पोलिसांनी कारवाई केली आहे. आज रविवार असल्याने अनेक पर्यटक नियम झुगारून लोणावळा परिसरात पर्यटनासाठी आल्याचे समोर आले आहे. अशा पर्यटकांवर लोणावळा पोलिसांनी थेट कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत. यात १० मोटरसायकल चालकांचाही समावेश असून त्यांनादेखील जिल्हाबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी दिली.

लोणावळ्यात पर्यटकांवर पोलिसांची कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा शहर परिसर हा दरवर्षी लाखो पर्यटकांना खुणावत असतो. परंतु, यंदा कोरोना प्रादुर्भाव असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटकांना मज्जाव केला आहे. मात्र, अनेक हौशी पर्यटक नियम झुगारून लोणावळ्यातील पर्यटनस्थळी जाण्यास उत्सुक असतात. अशाच मुंबईहून लोणावळा परिसरात वर्षाविहासाराठी आलेल्या पर्यटकांवर लोणावळा पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई आज रविवारी आणि शनिवारी केलेली आहे. यातील बहुतांश पर्यटक हे भुशी धरणाकडे जात असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, लोणावळा परिसरात पर्यटकांनी येऊ नये, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी केले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील संबंधित मार्गांवर पोलिसांचा फौज फाटा पाहायला मिळत असून प्रत्येक व्यक्तीची पोलिसांकडून विचारपूस केली जात आहे. तसेच, पर्यटनस्थळी जाणाऱ्या पर्यटकांना परत पाठवले जात आहे. तसेच पोलिसांची नजर चुकवून जाणाऱ्या पर्यटकांवर पोलीस थेट गुन्हे दाखल करत आहेत.

हेही वाचा - पुणे मनपाचे आयुक्त शेखर गायकवाडांची तडकाफडकी बदली; विक्रम कुमार नवे आयुक्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.