ETV Bharat / state

Pune News: धक्कादायक...माजी मंत्र्यांविरोधात पुण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल - माजी मंत्र्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

युती शासनात 1995 ला राज्यमंत्री असलेल्या एका लोकप्रतिनिधी माजी आमदारावर पुण्यातील बिबेवाडी पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. लोकप्रतिनिधीच असे करत असल्यामुळे आता चिंता व्यक्त केली जात आहे.

Pune News
माजी राज्यमंत्र्यावर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा
author img

By

Published : Feb 16, 2023, 2:20 PM IST

Updated : Feb 16, 2023, 3:54 PM IST

पुणे : भाजप-सेना युती सरकारमध्ये राज्याचे माजी सामाजिक न्याय, क्रीडा मंत्री असलेले उत्तम प्रकाश खंदारे (वय 65) यांच्यावर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अनैसर्गिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. लोकप्रतिनिधीच असे गुन्हे करीत असतील तर, सामाजिक परिस्थिती अणखी ढासाळण्यची शक्याता पुण्यातील नागरिकांचे म्हणणे आहे. एका पिडितेने खंडारे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. लग्नाचे अमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पिडीत महिलेला उत्तम खंदारे यांच्या पासून एक मुलगा झाला आहे. त्याच्या संगोपनासाठी आर्थिक तरतूद म्हणून चेक दिले मात्र, चेक बॅंकेत वटवले नाहीत. याबाबत विचारणा केल्यानंतर पिडीत महिलेतेला इतर आरोपींनी ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल : 37 वर्षे पीडित महिलेवरवर आमदार उत्तम प्रकाश खंदारे यांनी पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या आयबी रेस्ट हाऊस या शासकीय निवासस्थात बळजबरीने बलात्कार केल्याप्रकरणी बिबेवाडी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. उत्तम प्रकाश खंदारे हे मूळचे सोलापूरचे असून १९९५ मध्ये युतीच्या सरकारात राज्यमंत्री होते. 37 वर्षी पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून त्यांनी वांरवार तिच्यावर अत्याचार केल्याचा महिलेचा आरोप आहे. पिडितेच्या म्हणण्यानुसार खंडारे यांनी अनैसर्गिक बलात्कार करुन वेळोवेळी अत्याचार केला होता असा आरोप तीने केला आहे.

पिडितेला विवस्त्र करून पट्ट्याने मारहाण : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार पिडीत महिला पुण्यात राहण्यास असून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून मुलांचा सांभाळ करतो असे, म्हणत उत्तम खंदारे यांनी बळजबरीने शारिरीक संबंध ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीत पिडीत महिलेला बीरेस्ट हाऊस तसेच इतर ठिकाणी चाकूचा धाक दाखवून अनैसर्गिक पद्धतीने तसेच बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याच म्हटले आहे. पिडितेने नकार दिल्यानंतर तिला विवस्त्र करून पट्ट्याने मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

महिलेने दिली तक्रार : खंदारे यांच्यासोबतच इतर तिघांचाही या गुन्ह्यात समावेश आहे. या घटनेने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. उत्तम खंदारे सोलापूर शहरातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. याप्रकरणी पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात एका ३७ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, उत्तम प्रकाश खंदारे, महादेव भोसले, बंडु दशरथ गवळी यांच्यासह एका महिलेवर भादंवी कलम ३७६, ३७७, ४२०, ४०६, ५०२ (२), ३४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हेही वाचा: Palghar Crime News पत्नीची हत्या करणार्‍या आरोपी पतीला राजस्थानमधून अटक

Last Updated : Feb 16, 2023, 3:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.