ETV Bharat / state

Sarpanch-Sub Sarpanch Fraud Case : सरपंच, उपसरपंचाविरोधात फसवणूकीसह सावकारीचा गुन्हा दाखल - सरपंचाने केली फसवणुक

पतीला वैद्यकीय उपचारासाठी खर्च झाल्याने अडचणीत आलेल्या महिलेला व्याजाने पैसे देत तिचे रो हाऊस खरेदी खताद्वारे घेत फसवणूक (Sarpanch Sub Sarpanch Fraud Case) केली. या प्रकरणी शिर्सूफळच्या माजी सरपंच, उपसरपंचासह पाचजणांविरोधात (Ex Sarpanch and Sub Sarpanch of Shirsuphal) बारामती तालुका पोलीस ठाण्यात फसणूकीसह सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

case of fraud on Ex Sarpanch and  Sub Sarpanch
शिर्सूफळच्या माजी सरपंच, उपसरपंचावर फसवणूकीसह सावकारीचा गुन्हा
author img

By

Published : Oct 20, 2022, 10:21 AM IST

Updated : Oct 20, 2022, 10:52 AM IST

बारामती ( पुणे) : पतीला वैद्यकीय उपचारासाठी खर्च झाल्याने अडचणीत आलेल्या महिलेला व्याजाने पैसे देत तिचे रो हाऊस खरेदी खताद्वारे घेत फसवणूक केली. या प्रकरणी शिर्सूफळच्या माजी सरपंच, उपसरपंचासह पाचजणांविरोधात (Ex Sarpanch and Sub Sarpanch of Shirsuphal) बारामती तालुका पोलीस ठाण्यात फसणूकीसह सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिमराव भिकाजी भंडारे (रा. भंडारेवस्ती, एरंडोली, अहमदनगर), विश्वास आटोळे, अतुल हिवरकर (दोघे रा. शिर्सूफळ, ता. बारामती), संजय निंबाळकर (रा. लासुर्णे, ता. इंदापूर) व ऋतुजा ढवाण (रा. कसबा, बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत भारती संभाजी जाधव (मूळ रा. काटेवाडी, ता. बारामती, सध्या रा- तांबेनगर, बारामती) यांनी फिर्याद (case of fraud on Ex Sarpanch and Sub Sarpanch) दिली.

फायनान्स लोन : फिर्यादीचे पती बारामती एमआयडीसीतील एका कंपनीत काम करत होते. त्यांच्यावर सन २०१२ ते २०१४ या कालावधीत बारामतीत विविध हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांच्या अौषधोपचारकामी मोठा खर्च झाला होता. या दरम्यान ७ ऑगस्ट २०१४ रोजी फिर्यादीच्या पतीचे निधन झाले. त्यांना अनेकांची रक्कम देणे होते. त्यामुळे रो-हाऊसवर कर्ज मिळेल का ? याची चौकशी करत असताना त्यांचा मुलगा अभिषेक याच्या मित्राने निंबाळकर व हिवरकर यांच्याशी फायनान्स लोनसंबंधी त्यांची ओळख करून दिली. या दोघांनी फिर्यादीच्या घरी जात त्यांच्याशी चर्चा (case of fraud) केली.

लोनसाठी कागदपत्रे : लोनसाठी रो-हाऊसची कागदपत्रे घेतली. संभाजीनगर येथील शुभम फायनान्ससाठी ती घेतली असून २५ लाख रुपयांचे लोन मंजूर झाल्याचे सांगितले. परंतु फायनान्स कंपनीच्या अधिकाऱयांना पाच लाख रुपये कमिशन द्या, अशी मागणी केली. त्यावर फिर्यादीने फायनान्स कंपनीच्या कार्यालयात जावून विचारणा केली असता कोणतेही कमिशन घेतले जात नसल्याचे सांगण्यात आले. परंतु निंबाळकर व हिवरकर यांनी पाच लाख रुपये रक्कम बाकी ठेवून उरलेली रक्कम घेण्यास सांगितले.

तारण म्हणून रो हाऊसची नोटरी : काही दिवसाने फिर्यादीने पुन्हा फायनान्स कार्यालय गाठले असता लोन रद्द झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर निंबाळकर व हिवरकर यांनी दुसरीकडून लोन घेवू, असे सांगत कागदपत्रांची फाईल स्वतःजवळ ठेवली. तुम्हाला पैशाची अत्यंत गरज असे,ल तर विश्वास तानाजी आटोळे यांच्याकडून आपण रक्कम घेवू असे त्यांना सांगितले. नड असल्याने पिर्यादीने त्यांच्याशी चर्चा करत १५ लाख रुपये पाच टक्के शेकड्याने घेतले. तारण म्हणून रो -हाऊसची नोटरी करून देण्याची मागणी करण्यात आली. त्यासाठी २० ते ३० हजार रुपये खर्च येईल, असे सांगण्यात (Sarpanch Sub Sarpanch Fraud Case) आले.

रो हाऊसचे खरेदीदस्त : प्रत्यक्षात नोटरीऐवजी रो-हाऊसचे खरेदीदस्त करून घेण्यात आले. फिर्यादीच्या पतीचे निधन झालेले असल्याने मनस्थिती ठिक नसताना दुय्यम निबंधक कार्यालयात नेत दस्त वाचण्यास न देता स्वाक्षरी घेण्यात आली. त्यापोटी फिर्यादीला १२ लाख रुपये बॅंक खात्यावर देण्यातआले. ३० जानेवारी २०२० रोजी आटोळे यांनी चार महिन्याच्या व्याजाच्या रकमेपोटी त्यांच्याकडे ३ लाखाची मागणी करत ती रक्कम संजय निंबाळकर यांची पत्नी वैशाली यांच्या खात्यावर भरण्यास सांगितले. फिर्यादीने ही रक्कम भरली. हिवरकर व निंबाळकर यांनी कमिशनपोटी २ लाख रुपये मागितले त्यातील १ लाख १० हजााराची रक्कम फिर्यादीने वैशाली निंबाळकर यांच्या खात्यावर टाकली व ९० हजार रुपये निंबाळकर यांना रोख दिले.

खोटी कागदपत्रे : २५ ऑगस्ट २०२० रोजी ऋतुजा ढवाण व विश्वास आटोळे यांनी त्यांच्याकडे रो-हाऊसचा ताबा मागितला. त्यावेळी फिर्यादीला शंका आली. त्यांनी कागदपत्रे पाहिले असता ते खरेदीदस्त भंडारे यांच्या नावे केल्याचे दिसून आले. वास्तविक ही मालमत्ता फिर्यादीच्या पतीच्या नावे होती. दस्तानंतर महावितरणकडे खोटी कागदपत्रे सादर करून मीटर परस्पर दुसऱया नावे करून घेण्यात आला.

Last Updated : Oct 20, 2022, 10:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.