पुणे : डेक्कन पोलीस स्टेशन येथे ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण, शेखर सोनाळकर आणि उदय पवार यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी सुरज झंवर यांनी डेक्कन पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. सुरज सुनिल झंवर, वय-31 वर्षे धंदा व्यवसाय, रा. साई बंगला, प्लॉट नंबर 21, सुहास कॉलनी, जळगाव, येथे त्यांच्या कुंबासह राहतात. त्यांच्या वडिलांनी 2016 मध्ये पुणे, निगडी आणि नशिराबाद येथील तीन मिळकती खरेदी केल्या. या मिळकती खरेदी केल्यानंतर 4 वर्षांनी कुठेलीही कायदेशीर कारण नसताना राजकीय हेतूने फिर्यादीच्या वडिलांवर पुणे, आळंदी आणि शिक्रापूर येथे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. फिर्यादीचे वडील सुनिल झंवर यांना दिनांक 10 ऑगस्ट 2021 रोजी अटक करण्यात आली.
काय म्हटले आहे तक्रारीत : गुन्हा दाखल झाल्यापासुन आर्थिक गुन्हे शाखा, पुणे यांच्याकडे हा तपास सुरू होता. तिन्ही नोंदविलेले गुन्हे यात झालेली कार्यवाही राजकीय भाग असल्यामुळे सोईस्करित्या प्रविण चव्हाण यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आल्यासा दावा करण्यात येत आहे. त्यानंतर फिर्यादीच्या सर्व कंपनीची तसेच त्यांच्या नातेवाईकांची, त्यांच्या ऑफिसमधील काम करणाऱ्या कामगारांची बँक खाती जाणिवपूर्वक त्रास देण्याच्या व आर्थिक कोंडी करण्याच्या तसेच भितीचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने गोठवण्यात आली. या गुन्हयातील नमुद असलेली श्री. साई मार्केटींग कंपनी जळगाव या कंपनीसोबत माझा संबंध नसताना ही कंपनी ही पूर्णतः माझ्या वडीलांच्या नावावर असुन तसे कायदेशिर तसेच माझ्याविरुध्द कोणताही सबळ पुरावा नसताना मला 22 जानेवारी 2021 रोजी वरिल या गुन्हयात अटक करण्यात आली होती. परंतु उच्च न्यायालय, मुंबई यांनी मला सदर गुन्ह्यात मुक्त केले. या गुन्हयात काही सहभाग नसल्याचे न्यायालयीन आदेशात नमूद केल्याचा झंवर यांनी दावा केला आहे.
अशी झाली फसवणूक : यावेळी झंवर यांनी सांगितले की, फिर्यादी हे घोलेरोड पुणे येथील त्यांच्या वडिलांच्या मालकीच्या दुकानावर मित्र आयुष मनियार व विशाल पाटील यांचेसह बसले होते. दुपारी 04 वाजल्याचा सुमारास एक व्यक्ती माझ्याकडे आला होता. त्याने काळा रंगाचा कोट घातलेला होता. तो अंदाजे 30 से 35 वर्षे वयोगटातील होता, उंची अंदाजे 6 फुट होती. विशेष सरकारी वकील यांनी मला निरोप दिला आहे असे सांगितले. तुझ्या वडिलांची चार पाच वर्षे जेलमध्ये वाट लावुन टाकतो. मी यापूर्वी सुरेशदादा जैन, डिएसके कुलकर्णी व इतर आरोपीची देखील अशी वाट लावलेली आहे. तुमच्या कुंटुबीय यांची जप्त केलेली बैंक खाती पुढील दहा वर्षात मुक्त होवु देणार नाही. तेव्हा काहीतरी पुर्तता कर तरच फायदा होईल अन्यथा आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. फिर्यादीने सांगितलेल्या नुसार चाळीसगाव येथील ओरिजनल वाईन शॉपीचे मालक उदय पवार यांना एक कोटी वीस लाख रुपये दिले. यातील एक कोटी रुपये हे सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी घेतल्याचे पुरावा असल्याचे यावेळी फिर्यादी सुरज सुनिल झंवर याने म्हटले आहे. या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे आणि माझ्यासह अनेक नागरिकांची अशाच पद्धतीने फसवणूक झाली असून सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांची सखोल चौकशी व्हावी असे यावेळी झंवर याने म्हटले आहे.
हेही वाचा : विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना आमदार रमेश कदम विरोधातील खटल्यातून हटवले