पुणे : पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाटातील नागमोडी वळणावर एका ट्रकने कारला धडक दिल्याने कार खेड घाटाच्या दरीत कोसळली. पण, सुदैवाने कारमधील सर्व प्रवाशी सुखरूप आहेत.
नंदुरबारहून पुण्याच्या दिशेने जात असताना पुणे-नाशिक महामार्गावर खेड घाटात ट्रकने कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामुळे कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार घाटातील खोल दरीत गेली. मात्र, दैव बलवत्तर म्हणून वाचल्याची भावना कारमधील प्रवाशांनी व्यक्त केली.
खेड घाटात गेल्या अनेक दिवसांपासून अपघातांची मालिकाच सुरू असल्याने प्रवाशी जीव मुठीत धरुनच या मार्गावरून प्रवास करत आहेत. या घाटातून एकेरी मार्गावर अवजड वाहनांची दुहेरी वाहतूक सुरू झाली की वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होते.
खेड घाटाचा बायपास रखडला
पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाटातून धोकादायक प्रवास होत असताना नव्याने महामार्गावर खेड घाटात पर्यायी मार्गाचे काम चार वर्षांपासून सुरू आहे. मात्र, हे काम संथ गतीने होत असल्याने अपघात व वाहतूक कोंडीच्या समस्यांचा सामना या मार्गावर करावा लागत आहे.
हेही वाचा - पुणे जवळील कात्रज घाटात 'शिवशाही बस' दरीत कोसळली, बचावकार्य सुरू