पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील पुनावळे येथे भरधाव वेगात असलेल्या कारचा अपघात झाला होता. ही कार पलटी होऊन थेट रस्त्यालगत असलेल्या दुकानात शिरली होती. याप्रकरणी अल्पवयीन मुलावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दुकानाचे आणि अपघातग्रस्त कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. मांगीलाल जाट यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा - आजचा शेतकरीदिन शेतकऱ्यांसाठी इतिहासातील काळा दिवस - संजय राऊत