ETV Bharat / state

लाॅकडाऊन: जत्रा-यात्रा रद्द, सांगा आम्ही जगायचे कसे..?

राज्यात कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योगधंदे, व्यवसाय बंद आहे. अशातच हातावर पोट असणाऱ्या लोक कलावंतांचे हाल सुरू झाले आहेत.

cancellation-all-yatra-due-to-corona-virus
जत्रा-यात्रा रद्द, सांगा आम्ही जगायचे कसे...
author img

By

Published : Apr 3, 2020, 3:55 PM IST

पुणे- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योगधंदे, व्यवसाय बंद आहे. अशातच हातावर पोट असणाऱ्या लोक कलावंतांचे हाल सुरू झाले आहेत. या कलावंतांसाठी मुळात फक्त चार महिन्याचा मुख्य हंगाम असतो. मात्र, कोरोनामुळे यंदा तोही बुडाला आहे.

जत्रा-यात्रा रद्द, सांगा आम्ही जगायचे कसे...

हेही वाचा- 'हिंदू-मुसलमान' खेळ मांडणाऱ्यांच्या हाती आयते कोलीत!

त्यामुळे वर्षभर काय खायचे? घर कसे चालवायचे? असा प्रश्न लोक कलावंतांना पडला आहे. तमाशा, भारुड, दशावतार, खडी गंमत, पोवाडा, शाहीर असे सर्वच जण अडचणीत आहेत. एका ग्रुपमध्ये पडद्यामागचेही कलाकार असतात. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असणारी कुटुंबेही रस्त्यावर आली आहेत. या कलाकारांची समस्या लक्षात घेऊन त्यांना सरकारने मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, महाराष्ट्राची लोककला व लोकपरंपरा जिवंत ठेवणाऱ्या कलावंत व त्यांचे सहकारी यांना उपजीविकेसाठी किमान आर्थिक मदत करण्याची मागणी गायक आनंद शिंदे यांनी याआधी केली आहे. केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करणे, हे आपले प्रथम कर्तव्य आहे, असे समजून माझ्यासारखे असंख्य मराठी कलावंत घरात राहुन सरकारच्या आदेशाचे व सूचनांचे पालन करत सरकारच्या प्रत्येक आवाहानाला सहकार्य करीत आहे. त्यामुळे घरी बसलेल्या कलाकाराला किमान आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शिंदे यांनी केलेली आहे.

दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज 10 वा दिवस आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.