ETV Bharat / state

DRDO Pradeep Kurulkar : डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो? - कुरुलकरांची येरवडा कारागृहात रवानगी

डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांना 29 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आज कुरुलकर यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची रवानगी न्यायालयाने येरवडा कारागृहात केली आहे.

Pradeep Kurulkar
Pradeep Kurulkar
author img

By

Published : May 16, 2023, 9:55 PM IST

प्रदीप कुरुलकर यांच्या केलबद्दल माहिती देतांना वकिल

पुणे : पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेचे (डीआरडीओ) चे संचालक प्रदीप कुरुलकर यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून पाकिस्तानला माहिती दिल्याचा आरोप आहे. त्यांना एटीएसकडून अटक करण्यात आली आहे. आज कुरुलकर यांना न्यायालयात हजर करण्यात आले होत. यावेळी त्यांना 14 दिवसांची म्हणजेच 29 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. कुरुलकर यांची आत्ता येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

ऑफिशली सिक्रेट ॲक्ट खाली गुन्हा : याबाबत सरकारी वकील चंद्रकिरण साळवी यांनी याबाबत माहिती दिली की, न्यायालयाने आज न्यायालयीन कोठडी दिली आहे. तसेच तपास अधिकाऱ्यांनी देखील न्यायालयीन कोठडी मागितली होती. यांच्यात ऑफिशली सिक्रेट ॲक्ट खाली गुन्हा रजिस्टर आहे. तसेच पुढील तपास देखील सुरू आहे. देशद्रोहाचा गुन्ह्याबाबत साळवी म्हणाले की, याबाबत तपास सुरू असून कुरुलकर यांच्या मोबाईलमध्ये इमेज आढळुन आल्या आहेत. त्या इमेज फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आल्या आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर तपासाची पुढील दिशा ठरणार आहे. या प्रकरणी ऑफिशली सिक्रेट ॲक्ट खाली गुन्हा दाखल झाला असून तपास जसाजसा पुढे जाईल तसेतसे कलम वाढू शकतात.

मोबाईलमध्ये इमेज सापडल्या : काल एका दिवसाची कोठडी देण्यात आली होती. ती यासाठी देण्यात आली होती की, कुरुलकर यांच्याकडे जो मोबाईल होता तो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आल होता. तो डीकोडींग झाला नाही. तो कुरुलकर यांच्या मदतीने उघडण्यात आला. त्यात इमेज सापडल्या आहेत. त्या सर्व इमेज फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे, म्हणून काल एक दिवसीय कोठडी देण्यात आली होती.

देशद्रोहाचा गुन्हा दाखल? : आजच्या रिमांड रिपोर्टमध्ये एक कारण देण्यात आले आहे. या गुन्ह्याचा सखोल तपास हा करायचे आहे. हा गुन्हा राष्ट्राच्या विरोधातील असून अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे असे रिमांड रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. तसेच या गुन्ह्यात देशद्रोहाचा गुन्हा देखील दाखल होऊ शकतो असे यावेळी सरकारी वकील चंद्रकिरण साळवी यांनी म्हटले आहे.

तपासात सहकार्य : या प्रकरणावर कुरुलकर यांचे वकील ऋषिकेश गानु म्हणाले की, कुरुलकर यांना हाय शुगर असून डॉक्टरांनी जे औषधे द्यायला सांगितली आहे तेच औषधे त्यांना देण्यात यावे अस आमचा अर्ज होता. कोर्टाने ते मान्य केला आहे. आत्ता पर्यंतच्या तपासात आम्ही सहकार्य केले आहे असे यावेळी गाणु म्हणाले.

हेही वाचा -

  1. Nitin Gadkari Threat Call : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी
  2. Trimbakeshwar Temple Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेला प्रकार गंभीर ; देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
  3. Pradeep Kurulkar Judicial Custody : प्रदीप कुरुलकर यांना 29 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी; येरवडा कारागृहात होणार रवानगी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.