पुणे : शेती लाभाची व्हावी यासाठी विषमुक्त नैसर्गिक शेती आणि गटशेतीशिवाय पर्याय नाही. गटशेतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन यंत्र आणि नवे तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता निर्माण होत असल्यामुळे शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी गटशेतीला प्रोत्साहन देण्यात येईल, अस मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. ते पानी फाऊंडेशनतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप २०२२ च्या पुरस्कार वितरण सोहळ्यात आज प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला पानी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेते आमीर खान, किरण राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, आदी मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते.
![Satyamev Jayate Farmer Cup](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-02-paani-faundeshan-amir-khan-devendra-fadanvis-avb-7210735_12032023165822_1203f_1678620502_857.jpg)
वॉटर कपच्या माध्यमातून जलस्वयंपूर्ण गावे : आज मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांच्यामुळे जमिनीची रोग प्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. आणि अधिक उत्पादन देण्याची शक्ती देखील संपुष्टात आली आहे. तसेच, राज्यात दुसरीकडे कॅन्सरचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आपल्याला नैसर्गिक शेतीकडे यावे लागेल. राज्यात विषमुक्त नैसर्गिक शेतीचे मिशन देखील सुरू करण्यात आले आहे. तसेच, आज आपण पाहिलं तर पानी फाऊंडेशनद्वारे जे काम सुरू आहे. तसेच, त्यांच्या माध्यमातून जे वॉटर कपच्या माध्यमातून जलस्वयंपूर्ण गावे तयार करणे विषमुक्त शेती आणि शेतकऱ्यांचे देखील गट तयार करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक कशी करता येईल याचे सुंदर मॉडेल पानी फाउंडेशनने तयार केले आहे. तसेच, फाऊंडेशनद्वारे घेण्यात आलेल्या फार्मर कपमध्ये भाग घेतलेल्या शेतकऱ्यांचा प्रशिक्षक म्हणून इतरांना देखील याचा मार्गदर्शन करण्यासाठी उपयोग होणार आहे. असही यावेळी फडणवीस म्हणाले आहेत.
![Satyamev Jayate Farmer Cup](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-02-paani-faundeshan-amir-khan-devendra-fadanvis-avb-7210735_12032023165822_1203f_1678620502_785.jpg)
शेतकऱ्यांनी गट तयार करून आपल्या क्षमता वाढवाव्यात : राज्याचे मउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहेमीच पानी फाऊंडेशनच्या प्रवासात आम्हाला सहकार्य केल आहे. त्यांनी केलेल्या सहकार्यानेच आम्हला आज चांगले काम करता आले आहे. आज राज्यातील शेतकऱ्यांनी गट तयार करून आपल्या क्षमता वाढव्या तसेच वैज्ञानिक आणि संशोधकांनी सांगितलेल्या गोष्टी आत्मसात करून पुढे जावे, जेणेकरून येत्या काळात हजारो कृषी उद्योजक तयार करायचे आहे. तसेच, शेतीला व्यवसायाच्यादृष्टीने पाहून नवतरुणांनी शेतीकडे वळावे आणि यातील समस्यां सोडवावे अस यावेळी अभिनेते आमिर खान म्हणाले आहेत.
हेही वाचा : Ramdas Athawale on Raj Thackeray : आठवलेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचले; म्हणाले, आम्हाला त्यांची...