पिंपरी-चिंचवड - पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शनिवारपासून मंगळवारपर्यंत 15 जबरी चोरी आणि घरफोड्याच्या घटना घडल्या आहेत. गुन्ह्यात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे.
पोलीस आयुक्तांनी दिला इशारा -
पिंपरी शहरात मोबाइल हिसकावून तसेच घरातून चोरी केल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये १५ गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. लवकरच यातील चोरांच्या मुसक्या आवळून मास्टर माईंडला देखील बेड्या ठोकण्यात येतील. तसेच चोरीच्या मोबाईलची विक्री करणाऱ्यांवर देखील कारवाई येईल, असा इशारा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला होता.
शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच -
पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर जबरी चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल होतात. दरम्यान, 15 गुन्हे दाखल झाले असल्याचे समोर आले आहे. दररोज वाहनचोरी, घरफोडी आणि सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडत असतात. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अशा गुन्ह्यांमध्ये घट होईल असे वाटले होते. परंतु, दुर्दैवाने अस घडले नाही. शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे, मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
शहरात पोलिसांची गस्त वाढावी - नागरिकांची आपेक्षा
शहरात दररोज किमान दोन-तीन दुचाकी, घरफोड्या, मोबाईल हिसकावणे, सोनसाखळी हिसकावणे अशा घटना घडतायेत. त्यामुळं नागरिकांनी पोलिसांची गस्त वाढवली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश याकडे लक्ष देणार का? असा ही प्रश्न आहे.
हेही वाचा - ग्राहकानेच ऑनलाईन वस्तू विक्री करणाऱ्या कंपन्यांना लावला चुना; आरोपी अटकेत