पिंपरी (पुणे) - पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत अल्पवयीन मुलाला गुन्हे शाखा युनिट चार च्या पथकाने ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडे चोरीतील विक्रीसाठी आणलेला एकूण 7 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलगा हा चार सराईत गुन्हेगारासह करायचा चोरी-
दरम्यान, अल्पयीन मुलाने तो किरण गुरुनाथ राठोड, शेखर संभाजी जाधव, विकी मांझी आणि कृष्णा उर्फ बॉबी संजय तांगतोडे यांच्यासह चोरी आणि फरफोडी करत असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नऊ पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांच्या या पथकाने केली ही कामगिरी-
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धर्मराज आवटे, पोलीस कर्मचारी प्रविण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, दादाभाऊ पवार, अदिनाथ मिसाळ, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मो. गौस नदाफ, वासुदेव मुंहे, शावर सिध्द पांढरे, प्रशांत सैद, सुनिल गुट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये, धनाजी शिंदे, आजिनाथ ओंबासे, सुखदेव गावंडे, गोंविद चव्हाण तसेच तांत्रिक विश्लेषन विभाग गुन्हे शाखेचे नागेश माळी, राजेंद्र शेटे, यांनी केली आहे.
हेही वाचा- भाजपच्या माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधींवर गुन्हा दाखल, तीन कोटींच्या अपहाराचे आरोप