ETV Bharat / state

Balbharati Book : शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे होणार कमी, यंदाच्या पुस्तकाचे 'हे' आहे वैशिष्ट्य....

दरवर्षी नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याबाबत चर्चा केली जाते. यावर मार्ग काढण्याचे आश्वासनदेखील दिले जाते. पण यंदाच्या या नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे दप्तराच ओझ हे कमी होणार आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तिक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने येत्या नव्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या पुस्तकांची रचना बदलली आहे.

बालभारतीचे पुस्तक
बालभारतीचे पुस्तक
author img

By

Published : May 25, 2023, 2:40 PM IST

Updated : May 25, 2023, 5:29 PM IST

बालभारतीचे पुस्तक कसे आहे?

पुणे : यंदाच्या शैक्षणिक वर्षात इयत्तानिहाय सर्व विषयांचे चार भाग करण्यात आले आहेत. प्रत्येक भागात सर्वच विषयांचे धडे असणार आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या या पुस्तकात एक धडा संपल्यानंतर वहीचे एक पान जोडण्यात आले आहे.

बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील म्हणाले, की राज्य सरकारने 8 मार्च 2023 साली राज्य सरकारने एक शासन निर्णय जारी केला आहे. यात विद्यार्थ्यांच्या पाठीवरील पुस्तकाचे ओझ कमी करण्यासाठी पाठ्यपुस्तकाची रचना ही एकात्मिक करण्यात आली आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या नियमानुसार पुस्तकाचे चार भाग करण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांना कसा मिळणार फायदा
विद्यार्थ्यांना कसा मिळणार फायदा

पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तके- बालभारतीच्या या नवीन पुस्तकांचे पहिल्या टप्प्यातील छपाईचे काम पूर्ण झाले आहे. पुस्तकांचे लवकरच शाळांना वाटप सुरू केले जाणार आहे. सध्या ही पुस्तके बालभारतीच्या गोडाऊनमध्ये आहेत. त्याचे वाटप हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके मिळणार आहेत. विद्यार्थ्यांना ही चारही पुस्तके प्रत्येक तिमाहीसाठी वापरता येणार आहेत. पाठ्यपुस्तकांच्या नव्या रचनेनुसार तीन-चार विषयांची पुस्तके चार भागांत एकत्रित केली आहे. या पुस्तकाच्या बरोबर मुलांना वर्गामध्ये वह्या आणाव्या लागणार आहेत. मुलांना गृहपाठ किंवा वर्गपाठासाठी वह्या घेऊन जाव्या लागणार असल्याचे बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले.

नव्या पुस्तकांचे चार भाग- प्रत्येक भागात प्रत्येक विषयाचे धडे असणार आहेत. या नव्या पुस्तकात प्रत्येक धड्यामागे वहीचे एक पान असणार आहे. या पानाचे नाव माझी नोंद असे असणार आहे. या माझी नोंदच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्येक धड्यानंतर विद्यार्थ्याला त्याची नोंद देखील करण्यात येणार आहे, असे यावेळी पाटील यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की या नव्या पुस्तकांचे चार भाग करण्यात आले आहेत. प्रत्येक भागात वेगवेगळ्या विषयांचे धडे देण्यात आले आहे.

जवळपास 75 टक्के दप्तराचे ओझे कमी होणार- यंदा चार भाग करण्याचा फायदा असा की पहिल्या तिमाही भागासाठी आत्ता विद्यार्थ्यांना एकच पुस्तक घेऊन जावे लागणार आहे. यामुळे जवळपास 75 टक्के दप्तराच ओझे हे कमी होणार आहे. विद्यार्थ्यांना हे चारही भागांचे पुस्तक एकत्रित देण्यात येणार आहे. मुलांना पहिल्या तिमाही परीक्षेसाठी एक पुस्तक आणि पुढील तिमाहीसाठी एक असे वर्षभरात चार पुस्तके घेऊन जाता येणार आहेत.

चारही भागातील पुस्तकांमध्ये अनुक्रमणिका- नव्या शैक्षणिक वर्षात नवीन पुस्तके बालभारतीकडून प्रकाशित करण्यात येणार आहेत. मुलांना धड्याबाबत महत्त्वाची नोंदही लिहिता येणार आहे. या चारही भागातील पुस्तकांमध्ये अनुक्रमणिका देण्यात आली आहे. त्यात मराठी, इंग्रजी, हिंदी, गणित, सामान्य विज्ञान, इतिहास व नागरिक शास्त्रज्ञ, भूगोल या विषयाचे धडे देण्यात आले आल्याचे पाटील म्हणाले.

हेही वाचा-

  1. HSC Results 2023 : विद्यार्थ्यांसह पालकांची धाकधूक वाढली; गुरुवारी बारावीचा निकाल, 'असा' करा चेक
  2. 12th Result : बारावीचा निकाल जाहीर; यावर्षीही कोकण विभाग नंबर वन, निकालात मुलांपेक्षा मुली ठरल्या भारी
  3. IAS Officers Maharashtra : आयएएस अधिकाऱ्यांच्या रिक्त जागांमुळे प्रशासनाचा वाढला ताण, राज्य सरकारने केंद्राकडे 'ही' केली मागणी

Last Updated : May 25, 2023, 5:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.