ETV Bharat / state

पुण्यात पालिका टॅक्स भरणाऱ्यांसाठी बंपर ऑफर, कार आणि ई बाईक मिळणार - प्रलंबित कर वसुलीचे उद्दिष्ट

पुण्यात कर भरणाऱ्यांना आता ई बाईक मिळणार आहे. प्रलंबित कर वसुलीसाठी महापालिकेने ही शक्कल लढवली आहे. त्यामध्ये आता किती जणांना लाभ मिळतो ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jun 7, 2023, 8:38 PM IST

पुणे : वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या विक्रीकरिता ऑफर देत असतात. हे आपण पाहतच असतो. परंतु आता पुणे महानगरपालिकेनेही कर वसूल व्हावी यासाठी नागरिकांना मोठी बंपर ऑफर दिली आहे. त्यामुळे याची सर्वत्र चर्चा होत आहे. जे नागरिक वेळेवर कर भरतील त्यांना पाच ते दहा टक्के तर सूट मिळणारच आहे. त्याचबरोबर कार किंवा ई बाईक नागरिकांना देण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेने कराचे जे उदिष्ट ठेवले ते पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत.

प्रलंबित कर वसुलीचे उद्दिष्ट - 15 मे ते 31 जुलै 2023 दरम्यान प्रलंबित कर वसुलीचे उद्दिष्ट पुणे महानगरपालिकेने ठेवलेले आहे. त्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे महानगरपालिकेतील नागरिकांना टॅक्स तर दरवर्षी भरावाच लागतो. परंतु तो जर भरला तर यावर्षी स्वतःची कार किंवा ही बाईक सुद्धा मिळणार असल्याचे महानगरपालिकेने आपल्या ट्विटर हँडल वरून सांगितलेला आहे.

बंपर ऑफरचा फायदा - नागरिकांना एक प्रकारे अमिष दाखवून कर वसुली करण्याचा प्रकार महानगरपालिका करत आहे. परंतु उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवाव्या लागतात. तशीच ही योजना असल्याचे महानगरपालिकेतर्फे सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे आता किती नागरिक या बंपर ऑफरचा फायदा घेतात. तसेच लवकरात लवकर कर भरतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यातून महानगरपालिकेला किती कर प्राप्त होईल हे पहावे लागेल.

करवसुलीसाठी विविध फंडे - अनेकदा नागरिक कितीही आवाहन केले तरी कर भरण्यात चालढकल करतात. त्यावेळी काही योजना सादर केल्या जातात. त्यानुसार करामध्ये काही सूट दिली जाते. तसेच वेळेत कर भरणाऱ्यांना इतर काही फायदे देण्याच्या योजना असतात. मात्र पुणे महानगरपालिकेने ई-बाईकची ही भन्नाट ऑफर दिल्याने कर वसुली मोठ्या प्रमाणात होईल अशी आशा महापालिकेला आहे. प्रत्यक्ष किती लोक या योजनेला प्रतिसाद देतात हे नजिकच्या काळात पाहायला मिळेल. तसेच हा योजना इतर शहरांतही लागू होण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.