ETV Bharat / state

Builder Nude Photos : बिल्डरचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी; मेल करून 8 कोटींची मागितली खंडणी - बिल्डरचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी

बिल्डरला खंडणीसाठी (ransom demanded by mail) धमक्या मिळण्याचे प्रकरण नवे नाही. मात्र, एका अज्ञात व्यक्तीने ई-मेल करून प्रसिद्ध बिल्डरला त्याचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागितली. पुणे शहरात हा प्रकार घडला आहे. आरोपीने कंपनीचे चेअरमनचे खासगी फोटो सामाजिक माध्यमांवर शेयर करण्याची तसेच कंपनीतील अधिकारी, माध्यम प्रतिनिधींसह इतरांना टॅग करून बदनामी करण्याची धमकी (Builder nude photos threatened to viral) देण्यात आली. तसेच बदनामी (Latest news from Pune) टाळायची असल्यास 60 बिटकॉईनची म्हणजे तब्बल 8 कोटी 30 लाख 40 हजारांची मागणी (8 crore ransom demanded by mail) करण्यात (Pune crime) आली.

Builder Nude Photos
न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी
author img

By

Published : Dec 4, 2022, 6:02 PM IST

पुणे : सध्या सोशल मीडियाद्वारे फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुणे शहरात देखील मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक सायबर गुन्ह्याबाबतची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिकाचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी (Builder nude photos threatened to viral) देऊन एकाने ईमेलद्वारे तब्बल 60 बिटकॉईन म्हणजे तब्बल 8 कोटी 30 लाख 40 हजारांची खंडणी मागितल्याचा (8 crore ransom demanded by mail) धक्कादायक प्रकार (Latest news from Pune) उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित बिल्डरने (Pune crime) दिलेल्या फिर्यादीवरून संबंधीत ई-मेलधारक व्यक्तीवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी : याप्रकरणी कंपनीत ब्रॅंड हेड म्हणून काम करणार्‍या महिलेनी संबंधित आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 29 नोव्हेंबर पासून सुरू आहे. फिर्यादी ह्या बांधकाम व्यावसायिक कंपनीत 2017 पासून ब्रॅंड हेड म्हणून काम करतात. त्यांच्याकडे कंपनीच्या चेअरमन तसेच इतर ईमेल तपासणे व ईमेल पाठविण्याचे काम आहे. 29 नोव्हेंबर रोजी फिर्यादी हे त्यांचे काम करत असताना त्यांना एका ईमेल आयडीवरून तीन वेगवेगळ्या कंपनीसंबंधित ईमेलवर मेल प्राप्त झाले. त्यामध्ये ईमेल करणार्‍या आरोपीने कंपनीचे चेअरमनचे खासगी फोटो सामाजिक माध्यमांवर शेयर करण्याची तसेच कंपनीतील अधिकारी, माध्यम प्रतिनिधींसह इतरांना टॅग करून बदनामी करण्याची धमकी देण्यात आली. तसेच बदनामी टाळायची असल्यास 60 बिटकॉईनची म्हणजे तब्बल 8 कोटी 30 लाख 40 हजारांची मागणी करण्यात आली.

माझ्या संयमाची वाट पाहू नका : हा सर्व प्रकार गंभीर असल्याने फिर्यादी यांनी चेअरमन यांना याबाबत कळविले. त्यावर त्यांनी ‘कोणीतरी खोडसाळपणा करत असेल त्याकडे दुर्लक्ष करा’ असे सांगितले. त्यानंतर 30 तारखेला त्यांना पुन्हा दुपारी ईमेल प्राप्त झाला. त्यानंतर पुन्हा आठ वाजता आणखी एक मेल आला. त्यावर ‘त्यांना माझ्या संयमाची वाट पाहू नका’ म्हणत चेअरमन यांचे खासगी फोटो पाठवून 60 बिटकॉईनची मागणी करण्यात आली. तसेच 5 बिटकॉईन तात्काळ पाठविण्याची ईमेलद्वारे धमकी देण्यात आली. तसेच 1 डिसेंबरच्या रात्री 9 वाजेपर्यंत एका वॉलेटवर 60 बिटकॉईनची खंडणी पाठविण्याची धमकी देण्यात आली.

बिल्डरची पोलीस ठाण्यात धाव : हे प्रकरण झाल्यावर बिल्डरने (चेअरमनने) तात्काळ सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. यासंबंधीत सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा तपासासाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.