पुणे - तळेगावहून एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील आंबी येथील ब्रिटिशकालीन पूल सोमवारी पहाटेच्या सुमारास अचानक कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, पुलावरून अवजड वाहतुकीला बंदी असताना देखील वाहनचालक पुलावरून वाहतूक करत होते.
सविस्तर माहिती अशी की, तळेगाव एमआयडीसीकडे जाणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलाचा मधला भाग अचानक सोमवारी पहाटे कोसळला. या घटनेत कोणतीही जीविहितहानी झालेली नाही. या पुलावरील अवजड वाहतूक गेली ५ वर्षे बंद करण्यात आली होती. दरम्यान, पुलाला धोकादायक पूल म्हणून संबंधित प्रशासनाने जाहीर केले होते. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या वाहनांना वाहतुकीस मज्जाव करण्यात आला होता. हा ब्रिटिश कालीन पूल इंद्रायणी नदीवर बांधण्यात आला होता.
हेही वाचा - होय.. मी पण सावरकर! पोस्टर्सच्या माध्यमातून पुणे भाजपकडून राहूल गांधींच्या वक्तव्याचा निषेध
तळेगाव एमआयडीसी असल्याने हजारो नोकरदार वर्ग या पुलावरून वाहतूक करत होते. मात्र, मुख्य रस्त्यावरील हा पूल कोसळल्याने आता तळेगाव एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी मोठा वळसा मारून जावे लागणार आहे. दरम्यान सोमवारी पहाटेच्या सुमारास पहिल्या शिफ्टमधील काही बस या पुलावरून गेल्या असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले आहे. त्यानंतर हा पूल कोसळल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
हेही वाचा - नव्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे देशातील बंधुभाव नष्ट होईल - अब्दुर रहमान