पुणे: याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, पुण्यातील वाघोली येथे हे दोघेही काही दिवसांपासून भाड्याच्या खोलीत राहत होते. ते वाघोली येथील एका महाविद्यालयात शिकत होते. आज पहाटेच्या सुमारास यशवंत महेश मुंडे याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. यामुळे आसपासच्या परिसरात एकच खळबळ उडाली.
प्रेयसी झाली फरार: घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. याबाबत प्रथमदर्शनी असे वाटत आहे की, प्रेयसी अनुजाने चाकूने प्रियकराच्या सर्वांगावर वार केले आहेत. मुंडे याला सकाळी रुग्णालयात हलविण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. दोघांच्या भांडणात आरोपी प्रेयसी देखील जखमी झाली आहे. सध्या ती फरार असून पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे.
सोन्याची अंगठी मागितल्याने खून: वाढदिवसासाठी गिफ्ट म्हणून एक प्रेयसीने प्रियकराकडे सोन्याची अंगठी मागितली होती. त्यानंतर प्रियकराने थेट प्रेयसीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना 15 जून, 2022 रोजी कडेगाव पोलिसांनी उघडकीस आणली. या प्रकरणी विटा येथील प्रियकरास अटक करण्यात आली आहे.
वाढदिवसाच्या गिफ्टची मागणी: याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द येथील येरळा नदीच्या पात्रामध्ये 6 जून रोजी एक महिलेचा मृतदेह आढळून आला होता. कडेगाव पोलीस ठाण्यामध्ये सदरच्या घटनेची नोंद झाली होती. त्यानंतर कडेगाव पोलिसांनी गतीने तपास केला असता सदर महिलेचा गळा आवळून खून केला. त्यानंतर नदीच्या पात्रात फेकून देण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. अधिक तपास केला असता यामध्ये धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. विटा या ठिकाणी असणाऱ्या एका सराफा व्यावसायिकाकडे 32 वर्षीय प्रियसीने वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून सोन्याची अंगठी मागितली. त्यामुळे सराफा व्यावसायिक राहुल पवार (वय 31) याने तिचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सराफा व्यवसायिकास अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा: