ETV Bharat / state

चॉकलेटचे आमिष दाखवत पुण्यात सात वर्षीय मुलावर 70 वर्षीय नराधमाचे लैंगिक गैरकृत्य - सात वर्षीय मुलासोबत

मुलाने चॉकलेट पाहिजे म्हणून आईकडे हट्ट धरला. यावेळी जवळच असलेल्या तक्रारदारच्या काकाने चॉकलेट घेऊन देतो असे सांगून त्या मुलाला सोबत नेले आणि लैंगिककृत्य केले.

चॉकलेटचे आमिष दाखवत पुण्यात सात वर्षीय मुलावर लैंगिक गैरकृत्य
author img

By

Published : Jun 3, 2019, 3:13 PM IST

पुणे : चॉकलेटचे आमिष दाखवून ७ वर्षीय मुलासोबत 70 वर्षीय नराधमाने लैंगिक गैरकृत्य केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली. नातेवाईकांच्या लग्नासाठी आईसोबत आलेल्या या मुलासोबत त्याच्या आईच्या काकानेच लैंगिक गैरकृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलाच्या आईने याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील 70 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सात वर्षीय मुलासोबत एका लग्नसोहळ्यासाठी पुण्यातील सोमवार पेठ परिसरात आली होती. दुपारच्या सुमारास या मुलाने चॉकलेट पाहिजे म्हणून आईकडे हट्ट धरला. यावेळी जवळच असलेल्या फिर्यादीच्या काकाने चॉकलेट घेऊन देतो असे सांगून त्या मुलाला सोबत नेले आणि लैंगिककृत्य करुन एका तासानंतर परत आणले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी पीडित मुलगा घरात सारखा चिडचिड करत होता आणि घाबरल्यासारखा दिसत होता. त्यामुळे आईने त्याला प्रेमाने जवळ घेऊन विचारणा केली असता, चॉकलेट घेऊन देण्यासाठी सोबत घेऊन गेलेल्या मावसाजींनी एका बिल्डिंगमध्ये नेवून घाणेरडे कृत्य केल्याचे मुलाने सांगितले.

दरम्यान, असे कृत्य करणारा मावसाजी कोण आहे हे त्या मुलाला दाखवण्यास सांगितले असता त्याने आरोपीकडे बोट दाखवले. तसेच संध्याकाळी देखील रिक्षामध्ये बसवून असेच कृत्य मावसाजींनी त्याच्यासोबत परत केल्याचेही मुलाने सांगितले. त्यानंतर पीडित मुलाच्या आईने नातेवाईकांसह जाऊन समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली.

Intro:(पोलीस स्टेशन व्हिज्युअल मोजोवर)
चॉकलेट देण्याच्या आमिषाने सात वर्षीय मुलासोबत 70 वर्षीय नराधमाचे लैंगिक गैरकृत्य..आरोपी पीडित मुलाच्या आईचा काका..पुण्यातील घटना

नातेवाईकांच्या लग्नासाठी आईसोबत आलेल्या एका सात वर्षीय मुलासोबत त्याच्या आईच्या काकानेच लैंगिक गैरकृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलाच्या आईने याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकणातील 70 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली.
Body:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सात वर्षीय मुलासोबत एका लग्नसोहळ्यासाठी पुण्यातील सोमवार पेठ परिसरात आली होती. दुपारच्या सुमारास या मुलाने चॉकलेट पाहिजे म्हणून आईकडे हट्ट धरला. यावेळी जवळच असलेल्या फिर्यादींच्या काकाने चॉकलेट घेऊन देतो असे सांगून त्या मुलाला सोबत घेऊन गेले आणि एका तासानंतर परत आले. दरम्यान दुसऱ्या दिवशी पीडित मुलगा घरात सारखा चिडचिड करत होता आणि घाबरल्यासारखा दिसत होता. त्यामुळे आईने त्याला प्रेमाने जवळ घेऊन विचारणा केली असता चॉकलेट घेऊन देण्यासाठी सोबत घेऊन गेलेल्या मावसाजी यांनी एका बिल्डिंगमध्ये घेऊन जात घाणेरडे कृत्य केल्याचे सांगितले.
Conclusion:दरम्यान, असे कृत्य करणारा मावसाजी कोण आहे हे त्या मुलाला दाखविण्यास सांगितले असता त्याने आरोपीकडे बोट दाखविले. तसेच संध्याकाळी देखील रिक्षामध्ये बसवून असेच असेच कृत्य केल्याचे सांगितले. त्यानंतर पीडित मुलाच्या आईने नातेवाईकांसह जाऊन समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.