पुणे - हवेली तालुक्यातील लोणीकंद येथे 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची गळा दाबून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी तिचा मित्र सागर वानखेडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलगी व सागर हे दोघे काही दिवसांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये पेरणे फाटा येथे राहत होते. चारित्राच्या संशयावरुन सागरनेच हत्या केल्याची कबुली दिली असून सागरला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती लोणीकंद पालीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप मानकर यांनी दिली आहे.
हेही वाचा - पुण्यात ऑक्सिजनसाठी रुग्णालय प्रशासनाची धावपळ; अनेक ठिकाणी 4 तासांचाच बॅकअप
हेही वाचा - पुणे : खेड तालुक्यात कोरोना बाधितांमध्ये वाढ; तर रेमडेसिवीरचा सावळा गोंधळ