पुणे - बेकायदेशीर धंदा करणाऱ्यांचे बींग फोडणाऱ्या व अशी माहिती पोलिसांना पुरवणाऱ्या तरुणाला वचपा म्हणून, धंदेवाल्यांनी बदडले आहे. तरुणाच्या डोक्याला जबर मारहाण करण्यात आली आहे. शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथे ही घटना घडली.
हेही वाचा - वाळू तस्करांवर पोलिसांचा छापा... 36 लाखांचा मुद्देमाल जप्त
सणसवाडी, लोणीकंद, शिक्रापूर, शिरुर, लोणिकाळभोर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर धंदे चालू आहेत. पुणे ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी अशांवर कारवाई देखील करत आहे. परंतु स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने हे व्यवसाय पुन्हा लगेच चालू होताना दिसत आहेत. तसेच धंदेवाल्यांना कारवाई होण्याबाबतची माहिती देखील अगोदरच मिळते कुठून हा देखील एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
बेकायदेशीर धंदे कोणाच्या आशीर्वादाने चालतात. एकीकडे पोलिसांकडून माहिती द्या तुमचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे सांगितले जाते. त्यामुळे माहिती देणाऱ्या तरुणाला मारहाण करण्यापर्यंत धाडस कुठून होते हादेखील एक प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मारहाण झालेल्या तरुणाने दिलेल्या माहितीनुसार "सणसवाडी येथील अवैध धंदे चालू असल्याबाबत कंट्रोल रूमला फोन करून माहिती दिली. त्यानंतर लगेच मला प्रविण दरेकर या मटका व्यवसायिकाचा फोन आला आणि तू आमच्या मटक्याची कंट्रोल मला माहिती का दिलीस? म्हणून विचारणा करुन मला डोक्यात आणि हाताला जबर मारहाण केली आहे. याबाबत मी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल केला आहे."
या विषयी बोलताना उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी सांगितले की, अशा घटना निंदनीय आहेत. परंतु कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालू दिले जाणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
हेही वाचा - पुन्हा जळीतकांड..! पत्नीची हत्या करुन पेट्रोल टाकून जाळला मृतदेह