बारामती (पुणे) - तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथे शुक्रवारी दोन नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. यामुळे येथील बाधितांची संख्या पाचवर पोहचली आहे. तर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 22 वर पोहचली आहे.
तालुक्यातील कोऱ्हाळे येथे 90 वर्षीय ज्येष्ठ नागरिकास कोरोनाची लागण झाली होती. यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांच्या 75 वर्षीय पत्नीलाही कोरोनाची लागण झाली. दरम्यान, या ज्येष्ठ नागरिकाच्या 24 वर्षीय नातसून आणि 22 वर्षीय नातीला त्रास होऊ लागल्याने त्यांना पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, पुन्हा उपचारासाठी बारामतीत आले. यानंतर त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. शुक्रवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
दरम्यान, कोऱ्हाळे बुद्रुक येथील एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची बाधा झाल्याने कोऱ्हाळे गावासह बारामती तालुक्याची चिंता वाढली आहे.
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथे दोघांना कोरोनाची लागण - Baramati corona total patients
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे येथे 90 वर्षीय ज्येष्ठ नागरिकास कोरोनाची लागण झाली होती. यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांच्या 75 वर्षीय पत्नीलाही कोरोनाची लागण झाली. दरम्यान, या ज्येष्ठ नागरिकाच्या 24 वर्षीय नातसून आणि 22 वर्षीय नातीला त्रास होऊ लागल्याने त्यांना पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.