पुणे - मुंबई-बंगलोर महामार्गावरील डुक्कर खिंडीत रक्ताच्या थारोळ्यात एका सराईत गुन्हेगाराचा मृतदेह सापडला. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. आज दुपारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांना याची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जग्या उर्फ जगदीश पारध्ये (वय 28, रा. म्हाडा कॉलनी, वारजे) असे खून झालेल्याचे नाव आहे.
हेही वाचा - काळ्या जादूवर उपचारासाठी पैसे उकळणाऱ्या भोंदूंविरोधात गुन्हा दाखल
जग्या हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात खून, खुनाचा प्रयत्न यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. वारजे पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, डुक्कर खिंड परिसरात एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता तो मृतदेह कुख्यात गुन्हेगार जग्या पारधे याचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी हा मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा - हापूस आंब्याची पुण्यात दमदार एन्ट्री, पहिल्या पेटीला विक्रमी 25 हजारांचा भाव