ETV Bharat / state

विशेष : म्यूकरमायकोसिसमध्ये काळी बुरशी सर्वाधिक धोकादायक - डॉ. अविनाश भोंडवे

author img

By

Published : May 30, 2021, 7:49 AM IST

Updated : May 30, 2021, 7:59 AM IST

म्यूकरमायकोसिस हा एक बुरशीजन्य आजार आहे. रोग प्रतिकारकशक्ती कमी असलेल्या रुग्णांना यापासून जास्त धोका आहे. नाकाद्वारे ही बुरशी शरीरात जाते. तेथून ती सायनसमध्ये वाढते. कर्करोगाच्या पेशींपेक्षाही जलद गतीने वाढणारी ही बुरशी डोळ्यांतील पेशी, मेंदूतही प्रवेश करते.

dr. avinash bhondve
डॉ. अविनाश भोंडवे

पुणे - देशात कोरोनापाठोपाठ आता काळ्या, पांढऱ्या आणि पिवळ्या बुरशीचे संकट उभे राहिले आहे. देशात म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणत वाढ होत आहे. तर 250 हुन अधिक जणांचे मृत्यू झाले आहे, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.

म्यूकरमायकोसिस या आजाराबाबत बोलताना डॉ. अविनाश भोंडवे

म्यूकरमायकोसिस म्हणजे काय ?

म्यूकरमायकोसिस हा एक बुरशीजन्य आजार आहे. रोग प्रतिकारकशक्ती कमी असलेल्या रुग्णांना यापासून जास्त धोका आहे. नाकाद्वारे ही बुरशी शरीरात जाते. तेथून ती सायनसमध्ये वाढते. कर्करोगाच्या पेशींपेक्षाही जलद गतीने वाढणारी ही बुरशी डोळ्यांतील पेशी, मेंदूतही प्रवेश करते. त्यामुळे इतर बुरशीजन्य आजारांपेक्षा हा संसर्ग जास्त धोकादायक आहे. नाकातून काळसर द्रव बाहेर येणे, नाक सतत वाहणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळे लाल होणे, सुजणे, कमी दिसणे अशी याची प्रमुख लक्षणे आहे.

कोणाला जास्त प्रमाणात लागण?

कोरोना झालेल्या रुग्णांना म्यूकरमायकोसिस हा नवीन आजार होत आहे. यात काळी, पांढरी आणि पिवळी बुरशी या तीन प्रकारच्या बुरशी असतात. राज्यात काळ्या बुरशीच्या रुग्णांचे प्रमाण हे अधिक आहे. पांढरी बुरशीचे काही रुग्ण हे बिहारमध्ये आढळून आले आहेत. तर उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे काही रुग्णांना पिवळ्या बुरशीची लागण झाली आहे. यातील एक साम्य म्हणजे हा बुरशीजन्य आजार आहे. हा आजार कोरोना झालेल्या रुग्णांना होत आहे. त्यातही ज्यांना मधुमेह आहे आणि ज्यांना कोरोना झालं आहे तसेच ज्यांना स्टेरॉईड दिली गेली आहे, अशा रुग्णांना हा आजार सर्वाधिक होत आहे.

हेही वाचा - 'तारीख ठरवा, तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ'; आयएमएकडून रामदेव बाबांना खुल्या चर्चेचे आव्हान

राज्यात पाच हजारापेक्षा जास्त रुग्ण -

देशात आणि अनेक राज्यात म्यूकरमायकोसिसच्या रुग्णात वाढ होत आहे. त्यामुळे म्यूकरमायकोसिसचा साथरोग कायद्यात समावेश करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. राज्यात या म्यूकरमायकोसिसचे पाच हजारहून जास्त रुग्ण झाले आहे. त्यावर उपाय करणाऱ्या इंजेक्शनचाही तुटवडा आहे. यामुळे ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, अशा रुग्णांनी गाफील न राहता सतर्क राहायला हवे, असेही यावेळी डॉ. भोंडवे यांनी सांगितले.

काळी बुरशी जास्त धोकादायक, 50 टक्क्यांपेक्षा जास्त मृत्यूदर -

म्यूकरमायकोसिसमध्ये ज्या तीन प्रकारच्या बुरशी आहेत, त्यातील काळी बुरशी ही खूप धोकादायक आहे. दुर्दैवाने याचे रुग्ण राज्यात अधिक आहे. म्यूकरमायकोसिसचा उपचार हा 28 दिवस करावा लागतो. जर वेळेवर उपचार झाले नाही तर तो सर्वत्र पसरतो. त्यामुळे रुग्णाला हे खूप धोकादायक असू शकते. यांच्यात मृत्यूदर हे 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. काळी बुरशी ही नाकातून शरीरात जात असतो. ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे, अशा रुग्णांना हा आजार जास्त प्रमाणात धोकादायक ठरत आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात...राज्यात 20 हजार 295 नव्या रुग्णांची नोंद

Last Updated : May 30, 2021, 7:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.