ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवड शहराच्या उपमहापौरपदी भाजपाचे निष्ठावंत घोळवे यांची निवड - महापौर घोळवे बिनविरोध

एकेकाळी राष्ट्रवादीची हुकूमत असलेल्या पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या उपमहापौरपदी मुंडे समर्थक आणि भाजपाचे निष्ठावंत घोळवे यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराने माघार घेतल्याने घोळवे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

उपमहापौरपदी भाजपाचे निष्ठावंत घोळवे यांची निवड

author img

By

Published : Nov 6, 2020, 3:00 PM IST

Updated : Nov 6, 2020, 3:55 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड शहराच्या उपमहापौरपदी सत्ताधारी भाजपाचे निष्ठावंत केशव घोळवे यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादीच्या निकिता कदम यांनी माघार घेतल्याने घोळवे यांची बिनविरोध निवड झाली आहे. माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी ऑक्टोबर महिन्यात तडकाफडकी उपमहापौर पदाचा राजीनामा दिला होता.

विनंतीनंतर राष्ट्रवादीची माघार-

महापालिकेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभेत निवडणूक प्रक्रिया पार पडली. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. सव्वा अकरा वाजता अर्ज माघारी घेण्यासाठी पंधरा मिनिटांचा कालावधी दिला होता. सभागृह नेते नामदेव ढाके, केशव घोळवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अर्ज माघार घेण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देत निकिता कदम यांनी माघार घेतली.

पिंपरी-चिंचवड शहराच्या उपमहापौरपदी भाजपाचे निष्ठावंत घोळवे यांची निवड
उपमहापौरपदासाठी सोमवारी सत्ताधारी भाजपकडून केशव घोळवे यांनी अर्ज दाखल केला होता. पालिकेत भाजपचे बहुमत असल्याने त्याचवेळी त्यांची निवड निश्चित झाली होती. पण, संख्याबळ नसल्याचे आणि कोरोनाचे कारण देत नुकत्याच झालेल्या प्रभाग समिती, विषय समिती सभापतीपदाची निवडणूक न लढविणाऱ्या विरोधीपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने उपमहापौरपदाच्या निवडणुकीत उडी घेतली होती. उपमहापौर निवडीत चोरट्याने केला हात साफ? उपमहापौर पदाची निवड झाल्यानंतर दोन अज्ञात व्यक्तींनी काही जनांचे पाकीट मारल्याचा संशयावरून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांना तेथील उपस्थित कार्यकर्त्यांनी चोप दिल्याचीही बोलले जाते आहे. प्रत्येक्षात मात्र यासंबंधी अद्याप पोलिसात कोणीच तक्रार दिली नसल्याचं पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Last Updated : Nov 6, 2020, 3:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.