पुणे - खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात आघाडी व युतीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर आज भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी शक्तीप्रदर्शन करत अपक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक तिरंगी होत असताना युतीतील बंडाच्या शक्तिप्रदर्शनातूनच आता नवीन सक्षम पर्याय पुढे आला आहे.
खेड तालुक्यात भाजपची दोन जिल्हा परिषद, एक पंचायत तसेच दोन नगरपरिषद अशी एक हाती सत्ता आहे. मात्र, या मतदारसंघातील जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने खेड तालुक्यात सर्व नेते व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन बंड पुकारले आहे.
हेही वाचा तिकीट नाकारल्याने अशोक पाटील समर्थकांचा मातोश्रीबाहेर ठिय्या
त्यामुळे खेड-आळंदी विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत पहायला मिळणार असून, खेड तालुक्यात भाजपला कोणतेही स्थान नसताना मागील पाच वर्षाँपासून अतुल देशमुख यांनी स्वत:च्या नेतृत्वाखाली पक्षाची गावागावांत बांधणी करून जिल्हा परिषदेवर सत्ता आणली. ज्यांचे तालुक्यासाठी कोणतेही कर्तृत्व नाही, त्यांनाच तिकिट दिल्याने लोक हे स्वीकारणार नसल्याचे भाजपतून बंडखोरी केलेले अतुल देशमुख यांनी सांगितले. तसेच माझ्यासारखा तरुण उमेदवार हाच सक्षम पर्याय असल्याने आजी-माजी आमदारांना लोक यंदा घरी पाठवणार असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा काँग्रेसच्या 19 उमेदवारांची चौथी यादी जाहीर; मुख्यमंत्र्यांविरोधात आशिष देशमुख रिंगणात
तालुक्यातील माजी आमदार म्हणतात मला विद्यमान आमदारांना पाडण्यासाठी निवडणुक लढवायचीय तर विद्यमान आमदार सांगतात माझा कुनाला त्रास नाही मात्र खेड तालुक्यात हे वैभव उभं करण्यासाठी आजी-माजी आमदार बोलत नाही त्यामुळे आम्ही लोकांसमोर विकासाचे एक वेगळा पर्याय आपल्या समोर उभा केल्याचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटीलांनी आजी-माजी आमदारांना लक्ष केलं.