ETV Bharat / state

...अन् चंद्रकांत पाटील म्हणाले मी कोल्हापूरला परत जाणार

सर्वांनाच पुण्यात सेटल झाले पाहिजे असे वाटते, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सभागृहात म्हणताच हशा पिकला. त्यावर लगेच त्यांनी आपण कोल्हापूरला जाणार, देवेंद्रजी मी परत कोल्हापूरला जाणार असे म्हटले, त्यामुळे सभागृहात आणखीनच हशा पिकला.

पुणे
पुणे
author img

By

Published : Dec 25, 2020, 8:40 PM IST

पुणे - शहर असे आहे की सर्वांनाच ते आपले-आपले असे वाटते. सर्वांनाच येथे सेटल झाले पाहिजे असे वाटते, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सभागृहात म्हणताच हशा पिकला. त्यावर लगेच त्यांनी आपण कोल्हापूरला जाणार देवेंद्रजी मी परत कोल्हापूरला जाणार असे म्हटले, त्यामुळे सभागृहात आणखीनच हशा पिकला.

पुणे

विधानसभा निवडणुकांमध्ये कोल्हापूरमधील चंद्रकांत पाटील यांनी पुण्याच्या कोथरूड या सुरक्षित मतदारसंघातून निवडणूक लढवली. स्थानिकांची नाराजी असतानाही ते भाजप प्रदेशाध्यक्ष असल्याने जास्त विरोध झाला नाही. मात्र, तरीही बाहेरून आलेला आमदार असा काहीसा ठपका ठेवलाच जात असतोच. याची काहीशी मनात सल जाणवत असल्याने पाटील यांनी असे वक्तव्य केले की, काय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.

अटल संस्कृती गौरव पुरस्कार सोहळा

संस्कृती प्रतिष्ठानतर्फे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दिला जाणारा अटल संस्कृती गौरव पुरस्कार यावर्षी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आदी मान्यवर उपस्थित होते, यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.

बाहेरील उमेदवार म्हणून टीका

कोथरूडचे आमदार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विरोधकांकडून नेहेमीच बाहेरील उमेदवार म्हणून टिका होत असते. म्हणूनच आजच्या कार्यक्रमात त्यांनी विरोधकांना आणि त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर देत, मी परत कोल्हापूरला जाणार आहे, असे सांगितले आहे. चंद्रकांत पाटील यांनी जरी राजकीय दृष्टीकोनातून हे विधान केले असले तरी काही काळासाठी विरोधकांपेक्षा जास्त कोथरूडमधील इच्छुकांना जास्त आनंद झाला असावा, असेही बोलले जात आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस कोथरूड मतदारसंघातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळेस स्थानिक आणि बाहेरील उमेदवार अशी लढत झाली होती. यात चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारली. मात्र, त्यानंतरही विरोधकांकडून त्यांना बाहेरील उमेदवार असल्याची टिका करण्यात येत असते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.