ETV Bharat / state

कोरोनामुक्त 'पिंपरी चिंचवड' साठी भाजपाची बैठक, अनेक उपाययोजनांबद्दल झाली चर्चा

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला असून, सर्वसामान्य नागरिकांना मदत करण्यासाठी भाजपाची ‘टीम’ मैदानात उतरली आहे. भाजपा पिंपरी-चिंचवड शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक ‘झूम मिट’द्वारे घेण्यात आली. यावेळी शहरातील वाढती रुग्ण संख्या आणि उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड, corona
पिंपरी-चिंचवड
author img

By

Published : Apr 24, 2021, 10:43 AM IST

पिंपरी-चिंचवड - शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला असून, सर्वसामान्य नागरिकांना मदत करण्यासाठी भाजपाची ‘टीम’ मैदानात उतरली आहे. भाजपा पिंपरी-चिंचवड शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक ‘झूम मिट’द्वारे घेण्यात आली. यावेळी शहरातील वाढती रुग्ण संख्या आणि उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली.

भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, जिल्हाप्रभारी आमदार माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे यांच्यासह भाजपा पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीतील सर्व प्रदेश पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, मंडल पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख यांनीही बैठकीत सहभाग घेतला.

लसीकरण मोहीम सक्षमपणे राबवणार -

केंद्र सरकारने दि. १ मे २०२१ पासून १८ वर्षांपुढील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात सध्यस्थितीला ४५ वर्षांपुढील सुमारे ३ लाख नागरिकांचे यशस्वीपणे लसीकरण झाले आहे. आगामी काळात कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर प्रशासन भर देणार आहे. शहरात सुमारे १० लाख लोकांचे लसीकरण झाल्यास कोरोना संकटावर निश्चितपणे मात करता येईल. त्याकामी कार्यकर्ते, नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या सूचनांची नोंद केली आहे. दि. १ मे २०२१ रोजी शहरात १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुण- तरुणींचा लस घेतल्यानंतर प्रातिनिधिक सत्कार करण्यात येणार आहे. लसीकरण ठिकाणी गर्दी होवू नये. तसेच, सुरळीतपणे लसीकरण व्हावे. यासाठी भाजपाच्या वतीने शहरात ८२ ठिकाणी स्वयंसेवकाची नेमणूक केली आहे. त्याद्वारे लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवण्यावर भर देण्यात येणार आहे.

स्वत: ची काळजी घ्या, नागरिकांना मदत करा -

कोरोना काळात भाजपाच्या पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. कुटुंबाची काळजी घ्यावी. त्यानंतर सामाजिक बांधिलकी जोपासत नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर रहावे, असे आवाहन आमदार लांडगे यांनी केले. तसेच, शहरात भाजपाच्या वतीने शासकीय व खासगी रुग्णालयांच्या मदतीसाठी ३० जणांची टीम तयार करण्यात येणार आहे. त्याद्वारे प्लाझ्मादान, रक्तदान, लसीकरण मोहीम याबाबत जनजागृती, समस्या निराकरण व उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यातून शहराला कोरोनाच्या संकटापासून वाचवूया, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.