ETV Bharat / state

'राजा उधार झाला आणि शेतकऱ्यांच्या हाती भोपळा दिला', फडणवीसांची मुख्यमंत्र्यावर टीका - देवेंद्र फडणवीस लेटेस्ट न्यूज

कृषी कायद्याच महत्व पटवून देण्यासाठी भाजप नेते देशभर ठिकठिकाणी 'शेतकरी सन्मान मेळावे' आयोजित करत आहेत. या मेळाव्यात सहभागी होत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यावर टीका

author img

By

Published : Dec 25, 2020, 1:44 PM IST

पुणे- 'राजा उधार झाला आणि शेतकऱ्यांच्या हाती भोपळा दिला', अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकस्त्र सोडले. शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिले होते. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती भोपळा देण्याचं काम राज्य सरकारने केलं असल्याची टीका फडणवीस यांनी केली. कृषी कायद्याच महत्व पटवून देण्यासाठी भाजप नेते देशभर ठिकठिकाणी 'शेतकरी सन्मान मेळावे' आयोजित करत आहेत. पुण्याजवळील मांजरी बुद्रुक येथील शेतकरी सन्मान मेळाव्यात फडणवीस सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यावर टीका
देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यावर टीका

कृषी कायद्याच्या संदर्भात राज्य सरकारची दुटप्पी भुमिका-

साखरेसाठी मोदी सरकारने एम एस पी नक्की केला आहे. तर साखर उद्योगासाठी दोन लाख कोटी रुपयांचा निधी नक्की करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी तीन क्रांतिकारी कायदे पंतप्रधानांनी आणले. या कायद्याची आवश्यकता काय आहे? हमाली, भराई, तोलाई भाडे यात किती शेतकऱ्यांना पैसा द्यावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना यातून मुक्ती मिळाली पाहिजे. मात्र, काही लोकं या कृषी कायद्याचा संदर्भात दुटप्पी भूमिका घेत असल्याचे फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रात कंत्राटी शेतीचा कायदा 2006 साली झाला. या कायद्यामुळे कोणाची शेती हिसकावून घेतली गेली असे झालेलं नाही. जुन्या कायद्यात शेतकरी दाद मागण्यासाठी न्यायालयात जाऊ शकत नव्हते. मात्र, नवीन कायद्यानुसार शेतकरी न्यायालयात दाद मागू शकतो. तसेच मागील पाच वर्षांत ऊस आणि साखरेसाठी जेवढे निर्णय घेण्यात आले आहेत तेवढे याआधी कधीही घेण्यात आले नसल्याचे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा- गोरेगावच्या हुक्का पार्लरमध्ये पोलिसांचा छापा, सुमारे आठ कोटींचा हुक्का फ्लेवर जप्त

हेही वाचा- धक्कादायक..! सामूहिक बलात्काराची तक्रार देण्यास गेलेल्या पीडितेवर पीएसआयकडून पुन्हा बलात्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.