पुणे(पिंपरी चिंचवड) : शिवसेनेवर घाव घालण्याची तयारी भाजप करत आहे. आमच्या शिवाय दुसरा कुठला पक्ष आम्ही ठेवणार नाही. अशी भाजपची भाषा आहे. जो भाजप सोबत जातो त्यांना मदतीचा हात देण्याऐवजी ते त्या व्यक्तीचा रस्ता बंद करायचा अस भाजपच सुरू आहे. दिल्लीतील केंद्रीय भाजप ( Central BJP in Delhi ) नेहमी प्रादेशिक पक्ष संपविण्यासाठी प्रयत्न करतो. असा आरोप शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे ( Shiv Sena leader Neelam Gorhe ) यांनी केला आहे. त्या लोणावळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या की शिवसेनेची परंपरा असलेला विजयादशमीचा मेळावा आहे. प्रबोधनकारी हिंदुत्ववाची आमची भूमिका आहे. गेल्या दहा वर्षांपासून उद्धव ठाकरे ज्या प्रकारे शिवसेनेचा स्वतंत्र बाणा पुढे घेऊन जात आहेत, आणि आम्हाला राजकारणात गृहीत धरू नका अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे. तिचा आदर जनतेने केलेला आहे. पण, काही अडचणी आहेत. खास करून दिल्लीतील केंद्रसरकारमधील भाजप सरकार आहे, त्यांचा सातत्याने प्रयत्न प्रादेशिक पक्ष संपवण्याचा आहे. जो त्यांच्या सोबत जातो त्यांना मदतीचा हात देण्याऐवजी त्या माणसाचा रस्ता बंद करायचा हे कुठलं राजकीय कपटनीती आहे ?, हा संशोधनाचा विषय आहे. त्यांनी तस केलेलं आहे. आमच्या शिवाय दुसरा कुठला पक्ष आम्ही ठेवणार नाही अस देखील भाष्य त्यांनी केलं आहे. त्याचाच भाग म्हणजे ते शिवसेनेवर घाव घालण्याची तयारी केली आहे.
नीलम गोऱ्हे यांनी शिंदेंना सुनावले होते की : मुळ पक्षांचे नाव हे शिंदे गटाला वापरता येत नाही. त्यामुळे त्या सर्व आमदारांना प्रहार किंवा भाजपमध्ये प्रवेश करावा लागेल. महाराष्ट्रात गैरसमज पसरवल्या जात आहे, की शिवसेना नाव हे शिंदे गटाला मिळणार. मात्र निवडणूक आयोगाचा नियम आहे. त्यावर निर्णय घेण्यात येईल. राज्याची एक राज्यघटना आहे. त्यानुसार शिवसेनेची ही राज्यघटना आहे. ती कायदेशीर प्रकिया पार पाडावी लागेल. अन्यथा त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होईल. मात्र शिंदे गटाला भाजप किंवा प्रहारमध्ये विलीन व्हावे लागेल, असे सांगत गोऱ्हे यांनी घटनात्मक तरतुदीचा दाखला दिला. हा राज्य घटनेच्या परिषिष्ठाप्रमाणे कायदा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.