ETV Bharat / state

पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुडवडा; भाजपा आक्रमक

author img

By

Published : Apr 16, 2021, 12:46 PM IST

Updated : Apr 16, 2021, 2:28 PM IST

साथीचे आजार रोखण्याची जबाबदारी  राज्यसरकारची आहे. परंतु ही जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचेही मुळीक म्हणाले.

भाजपाचे आंदोलन
भाजपाचे आंदोलन

पुणे - शहरात मागील काही दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. रुग्णालय, मेडिकलमध्येही हे इंजेक्शन मिळत नसल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक हतबल झाले आहेत. काही रुग्णांच्या नातेवाईकांनी तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे इंजेक्शन मिळावे यासाठी बुधवारी आंदोलन केले होते. पुणे शहर भाजपच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यसरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावरही निशाणा साधण्यात आला.

लोकलमधून सर्वसामान्य प्रवास सुरूच

हेही वाचा - धक्कादायक..! एकाच कुटुंबातील पाच जणांचा कोरोनाने घेतला बळी

आरोग्यमंत्री राजेश टोपेंवर निशाणा
संपूर्ण राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना टोपे यांचे मात्र स्वतःच्या मतदारसंघावर लक्ष आहे. राज्यात ज्या ज्या ठिकाणी या इंजेक्शनचा तुटवडा होईल तिथे त्याचा पुरवठा करण्याचे काम आरोग्यमंत्र्यांचे आहे. परंतु या सर्वांकडे दुर्लक्ष करून आरोग्यमंत्र्यांचे आपल्याच मतदार संघात रेमडेसिवीरचा पुरवठा कसा होईल याकडे त्यांचे लक्ष असल्याचा आरोप भाजपाचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार
मागील काही दिवसांपासून शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे. हा काळाबाजार रोखावा यासाठी आम्ही जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना भेटून निवेदन दिले होते. परंतु हे रोखण्यासाठी प्रशासनाला अजूनही यश आलेले नसल्याचेही मुळीक म्हणाले. साथीचे आजार रोखण्याची जबाबदारी राज्यसरकारची आहे. परंतु ही जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचेही मुळीक म्हणाले.

हेही वाचा - राज्यात 61 हजार 695 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 349 मृत्यू

Last Updated : Apr 16, 2021, 2:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.