पुणे - राज्यभरात भाजपकडून राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. पुणे शहरातही बालगंधर्व चौकात धरणे भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
जनमत नसतानाही महाविकास आघाडी सत्तेत आली. सत्तेत येण्या आगोदर शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली होती. सत्तेत आल्यानंतर मात्र त्यांना याचा विसर पडला असून राज्यातील जनतेची आणि शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे. राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सत्ताधाऱ्यांना मात्र, स्वत:च्या बंगल्यांची आणि खुर्चीची चिंता आहे, असा आरोप पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे.
हेही वाचा - औरंगाबादच्या 242 शेतकऱ्यांना 'कर्जमुक्ती'
या आंदोलनात पुणे शहर भाजपचे आमदार, खासदार, नगरसेवक, कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.