ETV Bharat / state

लॉकडाऊनमध्ये नवीन वाहन नोंदणीला फटका, अनलॉकनंतर मात्र मोठी वाढ - Pune Vehicle Purchase News

कोरोना संसर्गानंतर निर्माण झालेली परिस्थिती आणि लॉकडाऊनमुळे ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठा फटका बसला होता. लॉकडाऊनच्या काळात वाहन क्षेत्राला करकचून ब्रेक लागला. वाहन विक्री खालावली होती. मात्र, आता लॉकडाउन उठल्यापासून वाहन विक्रीचा आलेख झपाट्याने उंचावत असल्याचे चित्र आहे. दसरा-दिवाळीसारख्या सणवारांमुळे वाहनविक्री वाढलेली दिसून येते आहे.

पुणे आरटीओ न्यूज
पुणे आरटीओ न्यूज
author img

By

Published : Nov 18, 2020, 1:14 PM IST

Updated : Nov 18, 2020, 1:39 PM IST

पुणे - कोरोना संसर्गानंतर निर्माण झालेली परिस्थिती आणि लॉकडाऊन यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठा फटका बसला होता. लॉकडाऊनच्या काळात वाहन क्षेत्राला करकचून ब्रेक लागला. वाहन विक्री खालावली होती. मात्र, आता लॉकडाउन उठल्यापासून वाहन विक्रीचा आलेख झपाट्याने उंचावत असल्याचे चित्र आहे. पुणे विभागाचा विचार केला तर 1 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या दीड महिन्याच्या काळात दसरा-दिवाळीसारख्या सणवारांमुळे वाहनविक्री वाढलेली दिसून येते आहे.

अनलॉक नंतर पुणे आरटीओमध्ये वाहन नोंदणीत मोठी वाढ

हेही वाचा - मनमाड शहरात गवळी बांधवांनी रेड्यांची झुंज लावून केली दिवाळी साजरी

कोरोनामुळे लॉकडाऊन काळात बसला मोठा फटका

कोरोनाकाळात वाहन निर्मिती आणि विक्री क्षेत्राला फटका बसला. 1 एप्रिल 2019 ते 30 सप्टेंबर 2019 या काळात एकूण चारचाकींची नोंदणी 26 हजार 523 होती. तर, एकूण दुचाकींची नोंदणी 95 हजार 28 इतकी होती. यंदाच्या वर्षी त्याच काळात म्हणजे 1 एप्रिल 2020 ते 30 सप्टेंबर 2020 दरम्यान एकूण चारचाकींची नोंदणी 11 हजार 323 झाली आहे. तर, एकूण दुचाकींची नोंदणी 22 हजार 338 इतकी कमी झाल्याचे पहायला मिळाले. वाहन क्षेत्राला या काळात मरगळ आल्याचे दिसून आल्याने एक नैराश्याचे वातावरण होते मात्र आता लॉकडाऊन हटवल्यानंतर वाहन क्षेत्राला आशादायक चित्र आहे...अनलॉक नंतरच्या दीड महिन्यात, 1 ऑक्टोबर 2020 ते 15 नोव्हेंबर 2020 या दीड महिन्यात पुण्यामध्ये 8473 कारची नोंदणी झाली आहे. हा आकडा जवळ जवळ गेल्या वर्षी इतकाच आहे या काळातील टू व्हीलर्सच्या नोंदणीत मात्र घट झालीय गेल्या वर्षी दीड महिन्यात 30180 टू व्हीलर्स ची नोंदणी झाली होती यावर्षी ती केवळ 18143 आहे ....

गेल्या वर्षीच्या तुलनेत महसुलात मोठी घट, मात्र अनलॉक नंतर सुधारणा

1 एप्रिल 2019 ते 15 नोव्हेंबर 2019 या काळात पुण्यामध्ये एकूण 750 कोटी 97 लाख 59 हजार 997 इतक उत्पन्न मिळालं होते त्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 333 कोटी 70 लाख 47 हजार 301 महसूल मिळाला आहे….गेल्या वर्षीच्या तुलनेत महसुलात मोठी घट जाणवत असली तरी मागील दीड महिन्यात 90 टक्के महसूल प्राप्ती झाली आहे पुढील काळात हा आलेख असाच उंचावत राहिला तर वार्षिक लक्ष्य गाठणं शक्य होणार आहे असा विश्वास परिवहन अधिकारी व्यक्त करतात त्यामुळे
एकंदरीतच गेल्या दीड महिन्यातील वाहन विक्रीची परिस्थिती पहिली तर वाहन क्षेत्र सावरत असून सकारात्मक वाटचाल सुरू झाल्याचे दिसून येत आहे...

हेही वाचा - दिवाळीत कमी झालेल्या मुंबईतील कोरोना चाचण्या आता वाढणार, काकाणी यांची माहिती

Last Updated : Nov 18, 2020, 1:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.