दौंड (पुणे) - दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथे काल दुपारी १२ ते २ च्या दरम्यान बोरीपार्धी येथील नामांकित वकील मानसिंग शितोळे यांच्या फ्लॅटमध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे. या चोरीत सोने आणि रोख रक्कम असा ४ लाख ९ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याबाबतची तक्रार केडगाव पोलीस स्टेशन येथे नोंदविण्यात आली आहे. घटनास्थळी यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी भेट दिली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
हेही वाचा - सानिया मिर्झाची नवी इनिंग, मालिकेतून करणार डिजीटल पदार्पण
मानसिंग शितोळे दुपारी त्यांच्या कार्यालयातून जेवण करण्यासाठी घरी गेले असता फ्लॅटचा दरवाजा उघडून घरात प्रवेश केल्यानंतर सर्व घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. मानसिंग शितोळे यांनी बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता त्यांना लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडा दिसला व सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेलं दिसले. त्यांनी सोने आणि रोख रक्कम २५ हजार रुपये ठेवले होते, तो ड्रावर दिवानवर पडलेला दिसला. यामुळे त्यांनी ताबडतोब आपल्या पत्नीला व मुलांना कॉल केल्यानंतर बाहेर खरेदीसाठी गेले असल्याची माहिती दिली. मानसिंग शितोळे यांच्या घराच्या बंद दरवाज्याचे कुलूप तोडून, दार उघडून घरात प्रवेश करून घरामध्ये लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख ९ हजार रुपये किमतीचा ऐवज त्यांना मिळून आला नाही. यावरून घरफोडी झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले . याबाबत मानसिंग शितोळे यांनी यवत पोलीस स्टेशन अंकित केडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा - कोरोनापासून वाचण्यासाठी सनी लिओनिचा ट्रान्सपरंट उपाय