ETV Bharat / state

Big Blow to CM Eknath Shinde : शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; 'या' नेत्यानं दिला पदाचा राजीनामा

Rajabhau Bhilare Resigns: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुण्यातील कट्टर समर्थक राजाभाऊ भिलारे यांनी शिवसेना (शिंदे गट) उपशहर प्रमुखपदाचा राजीनामा दिलाय. 'कोणाच्याही बंधनात काम करू शकत नाही, असं म्हणत भिलारे यांनी पदाचा राजीनामा दिलाय.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2023, 10:55 AM IST

पुणे : Rajabhau Bhilare Resigns : शिवसेनेत बंड पुकारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपासोबत सत्तेत सहभागी झाले. तेव्हा राज्यात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत एकनाथ शिंदे समर्थकांच्या कार्यालयाची तोडफोड देखील केली. पुण्यात देखील गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना वैद्यकीय कक्ष बघणारे शिवसेनेचे उपशहर प्रमुख राजाभाऊ भिलारे यांच्या कार्यालयाची देखील तेव्हा तोडफोड करण्यात आली होती. असं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे राजाभाऊ भिलारे (Rajabhau Bhilare) यांनी शिवसेना उपशहर प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय.

एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक : गेल्या अनेक वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात राजाभाऊ भिलारे हे काम करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे खंदे समर्थक समजले जाणारे भिलारे यांनी पक्षातील अंतर्गत मतभेदामुळं हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जातंय.

राजाभाऊ भिलारे यांचा राजीनामा : राजाभाऊ भिलारे यांच्यावर गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या प्रचार, प्रसाराची जबाबदारी होती. कोणाच्याही बंधनात काम करू शकत नाही. तसेच कोणाच्याही दबावाखाली हा निर्णय घेतलेला नाही, कोणाबद्दल काही तक्रार नसल्याचं म्हणत भिलारे यांनी राजीनामा दिलाय.

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा : बाळासाहेबांच्या व धर्मवीर यांच्या विचारानं प्रभावित होवून रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा म्हणूनच काम केल्याचं राजाभाऊ भिलारे म्हणाले. पदाधिकारी म्हणून काम करत असताना मान, सन्मान, अपमान सर्व सहन करत काम केलं. काम करताना कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास माफ करावं. असं म्हणत भिलारे यांनी सर्व सहकाऱयांना शेवटचा जय महाराष्ट्र केला.

हेही वाचा -

  1. शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील शिंदे गटात; उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का
  2. Baban Gholap Resign : शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा देताच बबनराव घोलप यांनी स्पष्टचं सांगितलं, गद्दारांना पक्षात...
  3. Sharad Pawar Resign: शरद पवार यांचा राजीनामा समितीने फेटाळल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.