ETV Bharat / state

Jalaparni In Lake : कात्रज तलाव घेणार मोकळा श्वास; पावसाळ्याआधीच तलावातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू - जलचर प्राणी

पुणे महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी पावसाळ्याच्या आधीच नाले सफाई तसेच नदीपात्रातील जलपर्णी ही काढली जाते. यंदा देखील महापालिकेच्या माध्यमातून नाले सफाई तसेच तलाव आणि नदीपात्रातील जलपर्णी हे काढण्यात येत आहे.असे असल तरी, पुणे महापालिकेच्या माध्यमातून आता कात्रज तलावातील जलपर्णी आणि तलावातील गाळ काढण्यात येत आहे.

Remove Jalaparni  In Katraj lake
जलपर्णी काढण्याचे काम सुरू
author img

By

Published : May 17, 2023, 6:35 PM IST

तलावातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू

पुणे : दिवसेंदिवस नदीत जलपर्णी ही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यांचाच फटका मासे पकडणा-या स्थानिक मच्छीमारी करणाऱ्या यांना बसला आहे. ज्या ठिकाणी जलपर्णी आहेत, त्या ठिकाणी जाळे पसरु शकत नाही. शिवाय जलपर्णीची वाढ अतिशय जलद असल्यामुळे काही दिवसात ही जलपर्णी मोठ्या प्रमाणावर पसरते. तर दरवर्षी पुणे महापालिकेच्या माध्यमातून पावसाळ्याच्या आधीच नाले सफाई तसेच नदीपात्रातील जलपर्णी ही काढली जाते.

जलपर्णी बरोबर गाळ काढला : मागील तीन ते चार वर्षापूर्वी पुण्यातील आंबिल ओढ्याला आलेल्या पुरामुळे, अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. जोरात आलेल्या पाण्याच्या प्रवाहाने अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. तसेच यावेळी मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले होते. आता याची दखल घेत भविष्यात पुरामुळे नुकसान होऊ नये यासाठी, महापालिकेच्या माध्यमातून आता कात्रज तलावातून जलपर्णी बरोबर गाळ देखील काढण्यात येत आहे.

पाण्याचा साठ्यात होणार वाढ: याबाबत महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप म्हणाले की, संपूर्ण पुणे शहरात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून जलपर्णी काढण्याचे काम केले जात आहे. शहरातील 5 तलावांमध्ये जलपर्णी काढण्याचे काम हे केले जात आहे. फक्त जलपर्णी काढली जात नाही तर, या ठिकाणी असलेली गाळ हे देखील काढण्यात आला आहे. तसेच कात्रज तलावातील पेशवेकालीन बंधारा आहे. त्याच देखील डागडुजी करण्यात येणार आहे. आता पर्यंत 90 टक्के जलपर्णी काढण्यात आली आहे. फक्त उर्वरित 10 टक्के जलपर्णी काढण्याचे राहीले आहे. तसेच गाळ काढल्याने पाण्याचा साठा देखील वाढणार असल्याचे यावेळी जगताप म्हणाले.

जलपर्णीमुळे मासेमारी धोक्यात: दिवसेंदिवस नदीची अवस्था बिकट होत चालली असताना, मात्र याकडे सातत्यांने दुर्लक्ष करण्यात येत आसल्यामुळे नकळत कारखान्यातील पाणी नदीच्या पात्रात सोडून देत असतात. याचाच फटका जलचर प्राणी यांना बसत असल्यामुळे माशांची वाढ कमी होत आहे. त्याचबरोबर मासे देखील मृत होत आहेत.

हेही वाचा -

  1. पिंपरीतील पवना नदीने घेतला मोकळा श्वास जलपर्णी काढल्याने नदी स्वच्छ
  2. उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यासाठी नागरिकांचा पुढाकार शासकीय यंत्रणा झोपेत
  3. Mumbai News सरप्राईझ भेट देऊन नालेसफाईची पाहणी करा मुंबईची तुंबई होणार नाही याची काळजी घ्या राजकीय पक्षांची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.