ETV Bharat / state

बीट पिकाला कवडीमोल बाजारभाव, उत्पादित पीक जनावरांना टाकण्याची वेळ - shirur farmer

ऊस शेतीत सतत ऊसाची लागवड केल्याने जमिनीचा पोत बिघडतो. त्यामुळे एका हंगामात ऊसानंतर बीटचे पीक घ्यावे, असा सल्ला कृषी तंज्ञांकडून दिला जातो. यानुसार ऊस शेती परिसरात बिटाची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. बिटासाठी एकरी २० हजारांपर्यंत खर्च लागतो. मात्र, एवढा खर्च करुनही शेतकऱ्यांच्या हातात ५ हजार सुद्धा येत नाही.

pune
बिटाला कवडीमोल बाजारभाव, पीक जनावरांना टाकण्याची वेळ
author img

By

Published : Mar 4, 2020, 10:48 AM IST

Updated : Mar 4, 2020, 1:30 PM IST

पुणे - शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील सविंदणे, कवठे, चांडोह, टाकळी हाजी या भागात मोठ्या भांडवली खर्चातून एक एकरमध्ये बीटची लागवड करण्यात आली. यातून भरघोस उत्पादनही झाले. मात्र, आता या बीटची दोन रुपये प्रति किलो प्रमाणे कवडीमोल बाजारभावाने विक्री होत त्यामुळे आता हे पीक जनावरांना टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

बीट पिकाला कवडीमोल बाजारभाव, उत्पादित पीक जनावरांना टाकण्याची वेळ

तुळशीदास शिंदे या शेतकऱ्याने आपल्या एक एकर शेतात पहिल्यांदाच बीटची लागवड केली. रोगांच्या प्रादुर्भावानंतर फवारणी करून कसेबसे हे पीक जगवले. काढणीला आलेल्या या पिकाला प्रति किलो २० ते ३० रुपये दराची अपेक्षा असताना मात्र केवळ २ रुपये दर मिळत आहे. यातून मजुरीचा खर्चही भागेनासा झाला आहे.

हेही वाचा - कोरोनाचे थैमान : भारताने रोखला इराण, इटली, जपान, दक्षिण कोरियाचा प्रवासी व्हिसा

ऊस शेतीत सतत ऊसाची लागवड केल्याने जमिनीचा पोत बिघडतो. त्यामुळे एका हंगामात ऊसानंतर बीटचे पीक घ्यावे, असा सल्ला कृषी तंज्ञांकडून दिला जातो. यानुसार ऊस शेती परिसरात बिटाची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. बीटसाठी एकरी २० हजारांपर्यंत खर्च लागतो. मात्र, एवढा खर्च करुनही शेतकऱ्यांच्या हातात ५ हजार सुद्धा येत नाही.

हेही वाचा - खुशखबर..! राज्यात लवकरच १०० युनिटपर्यंत वीज मिळणार मोफत?

या पिकासाठी लागणारे बी-बियाणे, खते, मजुरी, वाहतूक खर्च परवडत नसल्याने हे बीट जनावरांना घालण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली आहे. गेल्या १५ दिवसांपासून बिटाची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने शेतकरी मंचर बाजार समितीत बाजारभाव पडल्याचे रामदार थोरात सांगतात.

Last Updated : Mar 4, 2020, 1:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.