बारामती - ऑस्ट्रेलियातील बसल्टन मधील आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करत बारामतीच्या सतीश ननवरे यांनी तिसऱ्यांदा 'आयर्नमॅन' बनण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.
हेही वाचा - 'या' विक्रमात हिटमॅनपेक्षा विराटच भारी...तुम्हीच पाहा काय सांगते आकडेवारी
सतीश ननवरे यांनी ४.२ किलोमीटर स्विमींग, १८० किलोमीटर सायकलींग व ४२.२ किलोमीटर रनिंग अशी अत्यंत अवघड स्पर्धा १२ तास २८ मिनिटे व ५५ सेकंदात पूर्ण करीत स्वत:चाच विक्रम मोडला आहे.
देशभरातून या स्पर्धेत ३२ स्पर्धक सहभागी झाले होते. सतीश ननवरे यांनी याआधी ऑस्ट्रियातील क्लॅनफर्ट येथे झालेल्या तसेच स्वित्झर्लंडमधील झुरीच येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत यश संपादन केले होते. यंदाच्या स्पर्धेदरम्यान बसल्टन येथे वाऱ्याचा वेग कमालीचा होता, त्यामुळे १७ तासात ही स्पर्धा पूर्ण करण्याचे आव्हान स्पर्धकांपुढे होते. सतीश ननवरे यांनी मात्र अवघ्या १२ तास २८ मिनिटांतच ही स्पर्धा पूर्ण केली.