ETV Bharat / state

.. तर देशात नंबर एकचा तालुका म्हणून बारामतीची ओळख केली असती- अजित पवार - बारामती तालुक्याची ओळख

आपण समाजाचे काही देणे लागतो. या भावनेतून आम्ही काम करत असतो. आम्हाला याचे समाधान वाटते की, आपल्या कारकीर्दीत विविध कामे करू शकलो याचे एक वेगळेच समाधान असल्याच्या भावना उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केल्या.

बारामतीची ओळख केली असती- अजित पवार
बारामतीची ओळख केली असती- अजित पवार
author img

By

Published : Sep 4, 2021, 1:08 PM IST

Updated : Sep 4, 2021, 1:28 PM IST

बारामती (पुणे)- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील काळात विकास कामात खंड पडल्याची खंत व्यक्त करून दाखवली आहे. मागील टर्म मध्ये आपल्या विचाराचे सरकार असते तर बारामतीला कुठल्या कुठे नेऊन ठेवले असते. देशात विविध बाबतीत नंबर एकचा तालुका म्हणून बारामतीची ओळख निर्माण केली असती, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. पवार आज बारामती दौऱ्यावर होते. एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी बारामतीच्या विकासकामाबाबत माहिती दिली.

बारामतीची ओळख केली असती- अजित पवार

पवार पुढे म्हणाले, की मागील काळात आपल्या विचाराचे सरकार असते तर निश्चितच बारामती देशात नंबर एकचा तालुका म्हणून ओळखला गेला असता, पंरुतु जर-तर ला काही महत्त्व नसते. मात्र सध्या कोरोनाचे सावट असतानाही विकास कामांवर आपण त्याचा परिणाम होऊ दिला नसल्याचेही त्यांनी सांगितले. आपण समाजाचे काही देणे लागतो. या भावनेतून आम्ही काम करत असतो. आम्हाला याचे समाधान वाटते की, आपल्या कारकीर्दीत विविध कामे करू शकलो याचे एक वेगळेच समाधान असल्याच्या भावना उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केल्या.

शरद पवारांच्या विनंतीवरून बजाजकडून दीड लाख कोरोना डोस-

पवार साहेबांनी बजाज समूहला विनंती केली की आपले विविध उद्योग पुण्यासह महाराष्ट्रात आहेत. तुमचे पुण्यावर विशेष प्रेम आहे. त्यामुळे तुम्ही काहीतरी द्या. अशी विनंती करताच बजाज समूहाचे राहुल बजाज यांनी तात्काळ दीड लाख व्हॅक्सिनेशन उपलब्ध करून दिले आहेत. एकाच दिवसात सर्वाधिक म्हणजेच अडीच लाख लसीकरण करण्याचा विक्रम पुणे जिल्ह्याने केला. हा देशातील उच्चांक केला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. बजाज समूहाने यासाठी सुमारे दहा कोटी रुपयांचे दीड लाख व्हॅक्सिन उपलब्ध करून दिल्याचे ही पवार यांनी सांगितले.

Last Updated : Sep 4, 2021, 1:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.