ETV Bharat / state

BJP MPs industrialist visit Baramati : भाजपच्या 5 खासदारांसह उद्योगपतींचा बारामती दौरा, 2 दिवस पवार कुटुंबांकडे घेणार पाहुणचार - BJP MPs industrialist visit Baramati

सर्व खासदारांचे आज सकाळी बारामती विमानतळावर आगमन ( MPs arrived at Baramati Airport ) झाले. एकूण 19 खास लोकांचा हा दौरा आहे. यामध्ये 12 खासदार आणि काही उद्योगपतींचाही ( BJP MP in Baramati ) समावेश आहे. हे सर्व खासदार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP president Sharad Pawar ) , उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy CM Ajit Pawar ) , खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule ) आणि पवार कुटुंबीय बारामती व परिसरात झालेल्या विकासकामांचा आढावा घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

बारामती दौरा
बारामती दौरा
author img

By

Published : Mar 26, 2022, 8:32 PM IST

बारामती ( पुणे ) - विविध राज्यातील खासदारांचे आज बारामती येथे आगमन झाले. त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ( BJP MP meet Sharad Pawar ) भेट घेतली. खासदारांचा बारामती दौरा वैयक्तिक स्वरूपाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र विशेष म्हणजे या खासदारांमध्ये भाजपचे 5 खासदारही उपस्थित राहिले आहेत.

सर्व खासदारांचे आज सकाळी बारामती विमानतळावर आगमन ( MPs arrived at Baramati Airport ) झाले. एकूण 19 खास लोकांचा हा दौरा आहे. यामध्ये 12 खासदार आणि काही उद्योगपतींचाही ( BJP MP in Baramati ) समावेश आहे. हे सर्व खासदार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP president Sharad Pawar ) , उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy CM Ajit Pawar ) , खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule ) आणि पवार कुटुंबीय बारामती व परिसरात झालेल्या विकासकामांचा आढावा घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा-Sadabhau Khot Threat call : एसटी संपावरून सदाभाऊ खोत यांना धमकीचा फोन

2 दिवस पवार कुटुंबीयांचा घेणार खास पाहुणचार
आज सकाळी विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर या सर्व पाहुण्यांनी प्रथम लक्झरी बसमधून फेरेरो या आंतरराष्ट्रीय चॉकलेट कंपनीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी बारामतीत महिलांनी बांधलेल्या टेक्सटाईल पार्कला भेट देऊन तेथील महिलांशी संवाद साधला. त्यांनी या काळात येथील शिक्षण संकुल विद्या प्रतिष्ठानला भेट दिली. पाहुण्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे व आमदार रोहित पवार हे विकासकामांची माहिती देत ​​होते. हे 12 खासदार आणि काही उद्योगपती 2 दिवस पवार कुटुंबीयांचा खास पाहुणचार घेणार आहेत.

हेही वाचा-Kirit Somaiya protest : किरीट सोमैय्या यांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन

दौऱ्यात हे आहेत खासदार -

उद्या, रविवारी हे खासदार बारामतीला जाऊन कृषी विज्ञान केंद्राने उभारलेल्या इनक्युबेशन सेंटर, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा आढावा घेणार आहेत. हा वैयक्तिक दौरा असल्याचे सांगण्यात येत आहे. या दौऱ्यात तृणमूल काँग्रेस, बसपा आणि भाजप खासदारांचाही सहभाग आहे. बारामतीत आलेल्या खासदारांमध्ये शिवकुमार उदासी, निशिकांत दुबे, दुष्यंत सिंग, सीएम रमेश व भाजप खासदारांचा समावेश आहे. सौगता रॉय (तृणमूल काँग्रेस), लवू कृष्णा देवरियालू (युवजन श्रमिक), रितेश पांडे (बसपा), विवेक गुप्ता (तृणमूल काँग्रेस) हे इतर चार खासदार आणि काही मोठे उद्योगपती आहेत.

हेही वाचा-Devendra Fadnavis : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही : देवेंद्र फडणवीस

राष्ट्रपती निवडणुकीची तयारी आहे का?
एकीकडे पाचपैकी चार राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी सक्रिय झाले आहेत. अशा स्थितीत देशातील विविध राज्यातून भाजपचे पाच खासदार बारामतीत विकासकामे पाहण्यासाठी आले होते. ही राष्ट्रपती निवडणुकीची तयारी आहे का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.