बारामती (पुणे) - बारामती शहरातून चोरीला गेलेला छोटा हत्ती टेम्पो कोणताही तांत्रिक पुरावा नसताना बारामती शहर पोलिसांनी अवघ्या आठ तासांत शोधून काढला. याप्रकरणी अनिल भरत बळते (रा. जोगलादेवी ता. घनसांगवी जि.जालना) यास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हेही वाचा - जि.प शाळेचा आवार बनला तळीरामांचा अड्डा; खेड पोलिसांनी 4 जणांना घेतले ताब्यात
अज्ञात चोरट्याने टाटा कंपनीचा छोटा हत्ती टेम्पो चोरी केल्याची तक्रार प्रदीप ताकवले (रा.जळोची, ता.बारामती) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली होती. सदर गुन्ह्यात कोणताही तांत्रिक पुरावा नसताना गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळवून अवघ्या 8 तासांत शहर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक फौजदार शिवाजी निकम, पोलीस नाईक रुपेश साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार चव्हाण, अकबर शेख, दशरथ इंगोले यांनी केली.
हेही वाचा - बारामतीतील 80 वर्षांच्या 'बाई' ठरतायंत 'अन्नदाता'; दररोज ४०० रुग्णांना मिळतंय जेवण