ETV Bharat / state

बेकायदेशीर गावठी दारू विक्री करणाऱ्यांवर बारामती पोलिसांची कारवाई - illegal liquor selling in baramati

जयंत मीना अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग यांच्या आदेशावरून तालुक्याच्या हद्दीत बेकादेशीर गावठी दारू, हातभट्टी तयार करणाऱ्यांवर आणि त्याची विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली.

pune
बेकायदेशीर गावठी दारू विक्री करणाऱ्यांवर बारामती पोलिसांची कारवाई
author img

By

Published : Jan 19, 2020, 6:46 PM IST

पुणे - बेकायदेशीरपणे गावठी दारू बनविणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या 8 अड्ड्यांवर रविवारी बारामती पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत 1 लाख 63 हजार 209 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

बेकायदेशीर गावठी दारू विक्री करणाऱ्यांवर बारामती पोलिसांची कारवाई

हेही वाचा - माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षांच्या विरोधात आर्थिक अपहरणाचा गुन्हा दाखल

यासंदर्भात आलेल्या तक्रारीवरून जयंत मीना अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग यांच्या आदेशावरून तालुक्याच्या हद्दीत बेकादेशीर गावठी दारू, हातभट्टी तयार करणाऱ्यांवर आणि त्याची विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पिंपळी, शेंडे वस्ती आणि गुणवडी या भागांमध्ये एकूण 1 लाख 8 हजार 100 रुपयांची गावठी दारू जप्त करून जागीच नष्ट करण्यात आली. त्यामध्ये एकूण 22 बॅरेल कच्चे रसायन आणि इतर मुद्देमाल जागीच नष्ठ करण्यात आला. तसेच बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत घाडगेवाडी आणि सांगवी या भागात एकूण 55 हजार 100 रुपयांची गावठी दारू जप्त करून जागीच नष्ट करण्यात आली. त्यामध्ये एकूण 15 बॅरेल कच्चे रसायन आणि इतर मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला. या कारवाईमध्ये एकूण 1 लाख 63 हजार 209 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला.

हेही वाचा - कसा का होईना पण मी चारवेळा उपमुख्यमंत्री - अजित पवार

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, चालक सतीश मोरे, आरसीपी पथकातील 6 पोलीस जवान यांनी केली.

Intro:Body:बारामतीत बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई..

8 ठिकाणी छापे घालून 1,63,209 रु चा माल जप्त..

बारामती.. बेकायदेशीर दारू हातभट्टी (गावठी दारू) निर्मिती आणि विक्री बाबत असलेल्या तक्रारी वरून जयंत मीना, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग यांच्या आदेशान्वये बारामती तालुका हद्दीतील बेकादेशीर गावठी हातभट्टी तयार करणाऱ्यांवर आणि त्याची विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली.

सदरची कारवाई बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत पिंपळी, शेंडे वस्ती व गुणवडी या भागांमध्ये एकूण 1,08,100 रु, मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आली. त्यामध्ये एकूण 22 बॅरेल कच्चे रसायन व इतर मुद्देमाल जागीच नाश करण्यात आला. तसेच बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत घाडगेवाडी व सांगवी या भागात एकूण 55,100 रु मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला. त्यामध्ये एकूण 15 बॅरेल कच्चे रसायन व इतर मुद्देमाल जागेत नष्ट करण्यात आला. सदर कारवाई मध्ये एकूण 1,63,209 रु, चा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला.

सदरची कामगिरी. संदीप पाटील, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण. जयंत मीना, (आयपीएस) अप्पर पोलीस, अधीक्षक बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, चालक सतीश मोरे आरसीपी पथकातील 6 पोलिस जवान यांनी केली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.