ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट : बारामती शहरात 100 टक्के कडकडीत बंद

author img

By

Published : Mar 20, 2020, 7:55 PM IST

Updated : Mar 20, 2020, 8:29 PM IST

कोरोना या विषाणूचा संसर्ग आणि प्रादूर्भाव रोखण्याकरिता उपाययोजना म्‍हणून जिल्‍हाधिकारी, पुणे यांचे आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम २००५ अन्वये आदेशाप्रमाणे बारामती बंद ठेवण्यात आले आहे. यात शहरातील सर्व दुकाने, सेवा आस्‍थापना, उपहारगृहे, खानावळ, शॅापिंग कॉम्‍प्‍लेक्‍स, मॉल्‍स, सुपर मार्केट, ऑनलाईन लॉटरी सेंटर, परमिटरूम, बिअरबार, तसेच बारामतीमधील आठवडे बाजार यांचा समावेश आहे.

कोरोना इफेक्ट : बारामती बंद
कोरोना इफेक्ट : बारामती बंद

पुणे - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर बारामतीमध्येही प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता उपाययोजना म्‍हणून जिल्‍हाधिकारी यांनी आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 अन्वये दिलेल्या आदेशानुसार बारामती शहर बंद ठेवण्यात आले आहे. यात शहरातील सर्व दुकाने, सेवा आस्‍थापना, उपहारगृहे, खानावळ, शॅापिंग कॉम्‍प्‍लेक्‍स, मॉल्‍स, सुपर मार्केट, ऑनलाईन लॉटरी सेंटर, परमिटरूम, बिअरबार, तसेच आठवडे बाजार यांचा समावेश आहे.

कोरोना इफेक्ट : बारामती शहरात 100 टक्के कडकडीत बंद

यासोबतच शहरातील सर्वच विवाह कार्यालये, कापड दुकाने, शहरातील सराफ पेठाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. पुढील आदेश मिळेपर्यंत हे सर्व बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे बारामतीतील मुख्य बाजार पेठेसह शहरात सर्वत्रच शुकशुकाट पाहावयास मिळत आहे.

परिवहन कार्यालयाच्या कामकाजामध्ये बदल -

18 मार्च ते 31 मार्च 2020 पर्यंत वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशावरुन येथील परिवहन कार्यालयाच्या कामकाजात बदल करण्यात आलेला आहे. त्यानुसार मुख्यालय आणि शिबीर कार्यालय येथील कच्चे परवाना चाचणी पूर्णपणे बंद, तर ज्यांचे कच्चे परवाने काढून चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे, त्यांचे पक्क्या परवानाचे कामकाज करण्यात येईल. तसेच ऑटोरिक्षा परवाना कामकाज बंद, वाहन हस्तांतरण, वाहनांचे दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र तसेच वाहनांवरील बोजा उतरविणे इत्यादींसाठी वाहनमालकाने समक्ष स्वाक्षरी करण्याकरिता कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. तर त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र विहित नमुन्यामध्ये सादर करणे आवश्यक आहे, असे बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी सांगितले.

हेही वाचा - बंदमधून शेअर बाजाराला वगळले; बँकांचेही व्यवहार राहणार सुरू

बारामती आगारातील बस फेऱ्या रद्द -

कोरोना विषाणुचा फैलाव होण्याआधी बारामती ते पुणे दरम्यान जवळपास ५५ बस धावत होत्या. मात्र, आता त्यामध्ये घट होऊन 20 बस धावत आहे. प्रत्येक बसमधून केवळ २० प्रवाशी बारामती-पुणे दरम्यान प्रवास करत आहेत. बारामती बसस्थानकातून या आदी सुमारे 28 हजार प्रवासी ये-जा करीत होते. मात्र, प्रवासी संख्येत घट झाली. सद्यस्थितीत 9 ते 10 हजार प्रवासी प्रवास करत आहेत. या घटत्या प्रवासी संख्येमुळे बारामती-पुणे दरम्यान धावणाऱ्या बस आदीमधून सुमारे 12 लाखांपर्यंत उत्पन्न होत होते. मात्र, ते आता ७ लाखांवर आले आहे, असे आगारप्रमुख अमोल गोंजारी यांनी सांगितले.

Last Updated : Mar 20, 2020, 8:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.