ETV Bharat / state

Bajaj Finserv project : बजाज फिनसर्व्हची पुण्यात 5 हजार कोटींची गुंतवणूक, राज्यात निर्माण होणार 40 हजार रोजगार-उपमुख्यमंत्री - फडणवीसांनी बजाज फिनसर्व्हसोबत केला सामंजस्य करार

पुण्यात बजाज फिनसर्व्ह कंपनी ५ हजार कोटी गुंतवणार आहे आणि त्यातून ४० हजार नोकर्‍या निर्माण होतील अशी माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्र शासनाचे उद्योग सचिव हर्षदीप कांबळे आणि जाज फिनसर्व्हचे मुख्य वित्तीय अधिकारी एस. श्रीनिवासन यांनी करारवर स्वाक्षरी केली आहे.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jun 4, 2023, 2:20 PM IST

मुंबई : रोजगाराची वाट पाहणाऱ्या सर्व बेरोजगार तरुणांना आज महाराष्ट्र सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. यासाठी बजाज फिनसर्व्ह आणि महाराष्ट्र सरकारमध्ये एक करार झाला आहे. या सामंजस्य करारातून बजाज फिनसर्व्ह ही कंपनी विद्येचे माहेर घर असलेल्या पुण्यात जवळपास ५ हजार कोटी गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीतून ४० हजार नोकर्‍या निर्माण होतील, अशी माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

कोणता प्रकल्प येणार : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांच्या उपस्थितीत हा करार झाला आहे. महाराष्ट्र सरकार आणि बजाज कंपनीच्या या सामंजस्य करारावर सरकारचे उद्योग सचिव हर्षदीप कांबळे आणि बजाज फिनसर्व्हचे मुख्य वित्तीय अधिकारी एस. श्रीनिवासन यांनी स्वाक्षरी केली. प्रकल्पावर काम 2023 मध्ये सुरू होणार आहे. व्यवसायासाठी अत्याधुनिक कनेक्टिव्हिटी आणि सुविधांची आणल्या जातील. या प्रगतीचा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सकारात्मक परिणाम होईल, कारण यामुळे पुणे आणि आसपासच्या तसेच जागतिक स्तरावर भागीदार, विक्रेते, पुरवठादार आणि कंत्राटदारांसाठी नवीन नोकऱ्या आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होतील, असे निवेदनात म्हटले आहे.

  • आर्थिक सेवा क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात!

    महाराष्ट्र सरकार आणि बजाज फिनसर्व्ह यांच्यात सुमारे 5,000 कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार, बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष श्री संजीव बजाज यांच्या उपस्थितीत झाला.
    या गुंतवणुकीमुळे 40,000 रोजगार निर्मिती होऊन… pic.twitter.com/azoH4Das2x

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कुठे होणार प्रकल्प : महाराष्ट्र सरकारने बजाज फिनसर्व्हसोबत सामंजस्य करार केला आहे. त्याअंतर्गत नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी बजाज फिनसर्व्ह पुण्यात तब्बल 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. पुण्यातील मुंढवा येथे 19 एकर जागेत कंपनीच्या मुख्यालयाच्या कार्यक्षेत्रात सेवाप्रकल्प उभारला जाणार आहे. यामुळे राज्यात 40 हजार लोकांना रोजागार मिळणार आहे. या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर फडणवीस म्हणाले की, पुणे हळूहळू वित्तीय सेवांचे केंद्र बनत आहे आणि बजाज फिनसर्व्हच्या नवीनतम विकासामुळे या क्षेत्राला चालना मिळेल. मला वाटते की फिनटेक क्षेत्रात अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे.

बजाज फिनसर्व्ह महाराष्ट्रात करत असलेल्या गुंतवणुकीचे आम्ही स्वागत करतो. आम्हाला बजाज समूहाच्या महाराष्ट्राशी असलेल्या संबंधाचा अभिमान आहे. या प्रकल्पाचा विकास व्हावा यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य आम्ही देऊ. " - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यावेळी बोलताना संजीव बजाज यांनी पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची ग्वाही दिली. पर्यावरणाच्या किमतीवर प्रगती होऊ नये, असा आमचा विश्वास असल्याचे बजाज म्हणाले. अशाप्रकारे, आमच्या ईएसजी फोकसच्या अनुषंगाने हा प्रकल्प एक शाश्वत विकास असेल. जो ग्रीन सोल्यूशन्स आणि निव्वळ-शून्य दृष्टिकोनासह प्रमाणपत्रांच्या सर्वोच्च जागतिक मानकांची पूर्तता करेल.

आमच्या ग्रुपच्या सतत पाठिंब्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचे आभारी आहोत. पुणे हा बजाज फिनसर्व्हच्या वाढीच्या प्रवासाचा महत्त्वाचा भाग आहे आणि राहील." - संजीव बजाज, बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.