ETV Bharat / state

Pune Gaja Marne: राजकीय दबावापोटी पुणे पोलिसांची कुख्यात गुंड गजा मारणेवर मेहरबानी, न्यायालयात जामीन मंजूर

कुख्यात गुंड गजा मारणे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गजा मारणे याच्यावर मोक्का अंतगर्त गुन्हा दाखल आहे. मात्र, त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. गजा मारणेला मोक्कातून वगळण्यासाठी पुणे पोलिसांनी 169चा रिपोर्ट सादर केला आहे. या रिपोर्टमुळे पुणे पोलीस राजकीय दबावाला बळी पडलेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. तर गेल्या काही दिवसांपासून कारागृहात बंद असलेल्या कुख्यात गुंड गजा मारणेला अखेर जामीन मंजूर झाला आहे.

Pune Gaja Marne
कुख्यात गुंड गजा मारणे
author img

By

Published : Apr 4, 2023, 7:25 AM IST

Updated : Apr 4, 2023, 7:44 AM IST

गुंड गजा मारणेला अखेर जामीन मंजूर

पुणे: पुणे पोलिसांकडून कुख्यात गुंड गजा मारणेवर मेहरबानी करण्यात आले येत आहे. राजकीय दबावाला बळी पडून गजा मारणेला मोक्याच्या गुन्ह्यातून वगळण्यासाठी पोलिसांनी 169चा रिपोर्ट दिला आहे. राजकीय दबावाला पुणे पोलीस बळी पडले आहेत का? मुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांचा पुणे पोलिसांवर दबाव आहे का? पुणे पोलिसांना गजा मारणेला सोडण्यासाठी हा रिपोर्ट का द्यावा लागत आहे, असे अनेक प्रश्न उपस्थि होत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिल्या सूचना: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गजा मारणेचा चांगला फायदा करून घेता येऊ शकतो, अशी चर्चा आहे. त्यासाठी त्याला सोडवण्याचा प्रयत्न भाजपाच्या एका माजी खासदाराकडून करण्यात येत होता. सातत्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा यासंदर्भात पाठपुरावा करण्याचे काम हे खासदार करत होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलिसांना सूचना दिल्या. त्यानंतर तातडीने पुणे पोलिसांनी 169 च्या गुन्ह्यातून वगळण्यासाठीचा रिपोर्ट दाखल केला आहे.

राजकारणाचे गुन्हेगारीकरण करण्याचे महापाप : कुख्यात गुंड गजा मारणेला साताऱ्यातील वाईमधून 2022 ला अटक करण्यात आली होती. मोका अंतर्गत त्याच्यावर कार्यवाही करण्यात आली होती. त्यानंतर त्याची रवानगी येरवडा तुरुंगात करण्यात आली होती. राजकारणी आणि गुंड यांचे संबंध हे सर्व सर्वश्रुत असतात. त्यामुळे गजा मारणेला सोडण्यासाठी, माजी खासदार खूप प्रयत्न करत होते. कारण त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत घ्यायचा होता. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना पुणे पोलिसांना आदेश दिल्याचे माहिती आहे. त्यामुळे राजकारणाचे गुन्हेगारीकरण करण्याचे महापाप हे खरेतर राजकीय नेते आणि पोलीस प्रशासन करत असल्याची चर्चा आता पुण्यात होत आहे.

गुन्हेगारी वाढण्याची शक्यता: पुण्यातील गुन्हेगारी जगतामध्ये गजा मारणे याची एक दहशत आहे. पोलिसांनी ज्यावेळी अटक केली त्यावेळी तो वीस कोटी रुपये खंडणी मागण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा मोका लावण्यात आला होता. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे पोलिसांनी नेमके कुठल्या कायद्याने हे काम केले, हे पाहणे आता महत्त्वाचे आहे. याचा परिणाम पोलिसांवर किंवा समाजावर किती होतो हेही पहावे लागेल.

गुंड गजा मारणेला अखेर जामीन मंजूर: गेल्या काही दिवसांपासून कारागृहात बंद असलेला कुख्यात गुंड गजा मारणेला अखेर जामीन मंजूर झाला आहे. सोमवारी दुपारी पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात मारणे यांना जामीन मंजूर झाल्याचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी सांगितले आहे. व्यावसायिकाला 20 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी सहा महिन्यांपूर्वी गजा मारणे आणि त्याच्या सहा साथीदारांना पुणे पोलिसांनी सातारा येथून अटक केली होते. यानंतर सोमवारी पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोप पत्रात गजा मारणे विरोधात पुरावे नसल्याने मारणेला जामीन मंजूर करण्यात आले आहे. तर 25 हजार जात मुचलक्यावर गजा मारणेचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

पुण्यातील गॅंगवार निर्माण होण्याची शक्यता: कुख्यात गुंड गजा मारणे बाहेर आल्यावर आत्ता पुन्हा एकदा गँगवार होण्याची शक्यता आहे. पोलिसांना आत्ता सतर्क राहणे गरजेचे आहे. पुण्यातील घायवळ गॅंग आणि मारणे गॅंग यातला वर्चस्वारचा वाद पुण्यात एकेकाळी प्रचंड गाजला. त्यामुळे या दोन्ही गॅंगपासून पुण्यामध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती. इतक्या दिवसापासून तो तुरुंगात असल्याने पुण्यामध्ये मोठी शांतता निर्माण झाली होती. कुख्यात गुंड याची जेलमधून सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी जंगी मिरवणूक काढली होती. त्यावरून पुणे पोलिसांनी गजा मारणेला अटक केली होती.

हेही वाचा: Hasan Mushrif Ed Raid पुण्यात पुन्हा 9 ठिकाणी ईडीची छापेमारी हसन मुश्रीफ यांच्याशी कनेक्शन

Last Updated : Apr 4, 2023, 7:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.