पुणे - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून कोरोनाबाधित दीड महिन्याच्या बाळाला आणि त्याच्या ४ वर्षाच्या मोठ्या भावास १४ दिवसांच्या उपचारानंतर सुखरूप घरी सोडण्यात आले. ते दोघेही कोरोना पाॅझीटिव्ह होते. मुलांच्या आजोबाला सुद्धा कोरोनाची लागण झाली होती.
मुलांची आई मुंबईला प्रसुतीसाठी गेली होती. एक महिन्यांनी पुण्याला परत आली व बाळाला ताप आल्यामुळे वाय.सी.एम.रुग्णालय येथे दाखल केले होते. तेथे तपासणी केली असता बाळ व मोठा भाऊ दोघेही पाॅझिटिव्ह आले. तसेच आजोबा सुद्धा पाॅझिटिव्ह आले होते. तर आईचा अहवाल निगेटीव्ह आला होता. यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयातील बालरोग विभागात त्यांच्यावर उपचार केले. त्यातून ते संपूर्ण बरे झाले आहेत.