पुणे- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा व इतर गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करु नये, यासाठी शुक्रवारी पुणे नाशिक महामार्गावर पोलिसांनी जागृती केली.
हेही वाचा- COVID-19 LIVE : राज्यातील चार मोठी शहरे बंद; पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द!
राज्यात आपात्कालीन कायदा लागू करण्यात आला आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, यासाठी प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी शासनाच्या नियमाचे पालन करावे अन्यथा कारवाई केली जाईल, असेही राजगुरुनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी सांगितले.
जिल्ह्यातील लग्न सभारंभ, जत्रा यात्रा उत्सव, हरिनाम सप्ताह, व इतर सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच आज चाकण, राजगुरुनगर, मंचर, शिरुर, नारायणगाव, आळेफाटा, जुन्नर या प्रमुख शहरांतील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहे.