पुणे - येथील पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव वेगात असलेल्या गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना ऑटो क्लस्टर येथे घडली. सुदैवाने घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गाडी मालक अनिल भारती हे तत्काळ मोटारीमधून बाहेर पडले. ते स्वत: गाडी चालवत होते. ही घटना शॉर्टसर्किटमुळे घडली असल्याची शक्यता अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी वर्तवली आहे.
हेही वाचा- धक्कादायक..! महापालिका एका झाडावर करणार 59 हजाराचा खर्च
अनिल भारती हे त्यांच्या गाडीने (एम.एच-१२ एच.एल-३००) पिंपरीच्या दिशेने येत होते. तेव्हा, ऑटो क्लस्टरच्या सोमर अचानक धावत्या मोटारीच्या समोरून धूर निघला. काही क्षणात मोटारीला आगीने वेढले. त्यामुळे मोटार मालक अनिल भारती हे तत्काळ मोटारीच्या बाहेर पडले. ते स्वतः मोटार चालवत होते. दरम्यान, या घटनेत काही मिनिटात अवघी मोटार जळून खाक झाली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. परंतु, तोपर्यंत अर्धी मोटार जळून खाक झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली. हनुमंत होके, विजय घुगे आणि संभाजी दराडे या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यास मदत केली.