पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे मुख्य रस्त्यालगत फुलपरी स्वीट मॉल आहे. सोमवारी या दुकानात दोन तरुण आले. त्यांनी एक किलो काजू कतली घेतली मात्र दुकानदाराने पैसे मागितल्यावर त्यांनी पैसे देण्यास नकार (not giving free cashew nuts) दिला. त्यानंतर त्या तरुणांनी त्या दुकानदारावर गावठी पिस्तूल रोखून गोळी मारण्याचा प्रयत्न (Attempt To Shoot Shopkeeper Pune ) केला. मात्र गोळी बाहेर आली नाही. (Firing in sweet Mall) त्यानंतर त्या तरुणांनी पुन्हा पिस्तूल नीट तपासून गोळी झाडली. मात्र गोळी दुकानातच पडली. या सर्व गोंधळात त्या ठिकाणी गर्दी जमल्याचे पाहून आरोपींनी पळ काढला.
जमिनीवर पडलेली गोळी खरी : घटनेनंतर दुकानदारांनी खेळण्यातील बंदूक समजून त्या घटनेकडे दुर्लक्ष केले. मात्र व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगुने यांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांना झालेला प्रकार सांगितला. पोलिसांनी घटनेचे सीसीटिव्ही फुटेज तपासले. तसेच दुकानात बंदुकीतून पडलेली गोळी ताब्यात घेऊन तपासली असता,ती खरी असल्याचे लक्षात आले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी लागलीच आरोपींचा शोध घेतला. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल जप्त केले आहेत.