पुणे - सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कुलगुरू नितीन कळमळकरांसह पाज जणांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यापिठातील कॅन्टीनच्या जेवणावरून विद्यार्थी आणि प्रशासन यांच्यात निर्माण झालेल्या वादाच्या घडामोडीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॅन्टीनमधील जेवणात वारंवार अळ्या निघाल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. मात्र, विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेण्याऐवजी उलट त्या विद्यार्थ्यांवरच गुन्हे नोंद करण्यात आले होते. यावर विद्यार्थ्यांनीही कुलगुरू डॉ. नितीन कळमळकर यांच्यासह पाच जणांविरुद्ध न्यायालयात तक्रार दिली होती. यावर न्यायालयाने कुलगुरू विरोधात गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे पोलिसांना आदेश दिले. त्यानुसार चतु:शृंगी पोलिसांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांच्यासह पाच जणांविरोधात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध (अॅट्रोसिटी) कायद्यानवये गुन्हा दाखल केला आहे.