ETV Bharat / state

पुण्यातील शास्त्रज्ञांनी लावला मृत आकाशगंगेचा शोध; अंतराळ संशोधनातील मोठी घटना - जायंट मिटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप

जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बीण प्रकल्प असलेल्या जुन्नरच्या खोडद येथील जीएमआरटीच्या मदतीने पुण्यातील एनसीआरएच्या शास्त्रज्ञानी दुर्मिळ मृत आकाशगंगेचा शोध  लावला आहे. या आकाशगंगेच्या अवशेषांमधून रेडिओ लहरींचे उत्सर्जन होत आहे.

Giant Metrewave Radio Telescope
जुन्नरच्या खोडद येथील जीएमआरटीच्या मदतीने पुण्यातील एनसीआरएच्या शास्त्रज्ञानी दुर्मिळ मृत आकाशगंगेचा शोध  लावला आहे.
author img

By

Published : Jun 29, 2020, 7:46 PM IST

Updated : Jun 30, 2020, 7:11 PM IST

पुणे - जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बीण प्रकल्प असलेल्या जुन्नरच्या खोडद येथील जीएमआरटीच्या मदतीने पुण्यातील एनसीआरएच्या शास्त्रज्ञानी दुर्मिळ मृत आकाशगंगेचा शोध लावला आहे. या आकाशगंगेच्या अवशेषांमधून रेडिओ लहरींचे उत्सर्जन होत आहे. या संदर्भातले संशोधन राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकशास्त्र केंद्राच्या(एनसीआरए) डॉ.सी.एच ईश्वरचंद्रा आणि आफ्रिकेतील डॉ. झारा आर यांनी केले आहे. ते नुकतेच प्रकाशित झालेल्या 'आर्काईव्ह' या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे. 'जे 1615+5452' असं या आकाशगंगेचं नाव आहे.

रतीय जीएमआरटी रेडिओ दुर्बीण अनेक शोध लावण्यात यशस्वी होईल, अशी माहिती जीएमआरटीचे वरिष्ठ प्रशासन अधिकारी डॉ. जे. के. सोळंकी यांनी दिली.
नव्याने शोध लागलेल्या मृत आकाशगंगेची वैशिष्ट्ये

या आकाशगंगेचा विस्तार 3 लाख प्रकाशवर्षं इतका असून तिचे वय 7.6 कोटी वर्ष आहे. 150 ते 1400 मेगाहर्ट्झ लहरींचे उत्सर्जन तिच्यातून होत असल्याचे नोंदवण्यात आले आहे. सुमारे 30 टक्के भाग अजून नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे या परीक्षणात समोर आले आहे.

dead galaxy found by GMRT
जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बीण प्रकल्प असलेल्या जुन्नरच्या खोडद येथील जीएमआरटीच्या मदतीने पुण्यातील एनसीआरएच्या शास्त्रज्ञानी दुर्मिळ मृत आकाशगंगेचा शोध लावला आहे.
कृष्णविवराने संपूर्ण आकाशगंगा गिळंकृत केल्यानंतर त्यातील इलेक्ट्रॉनच्या वारंवारितेमुळे रेडिओ तरंग उत्सर्जित होतात. अशा आकाशगंगेचे अवशेष सापडणे तसे दुर्मिळ असते. पण, त्याचबरोबर तिचा अभ्यास करण्याचे आव्हानही असते. या शास्त्रज्ञानी पुणे जिल्ह्यातील खोडद येथील जायंट मिटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) आणि साऊथ आफ्रिकन ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्झवेटरीच्या साहाय्याने तिचा शोध घेतला आहे. ही अंतराळ संशोधनातील मोठी घटना मानली जात आहे.
dead galaxy found by GMRT
या आकाशगंगेचा विस्तार 3 लाख प्रकाशवर्षं इतका असून तिचे वय 7.6 कोटी वर्ष आहे.
पुणे जिल्ह्यातील खोडद येथील जीएमआरटी रेडिओ दुर्बीण खूप संवेदनशील असल्याने तिला मिळणारी माहिती अचूक व महत्त्वाची असते. संपूर्ण आकाशगंगाच कृष्णविवराने गिळंकृत केल्यावर त्यातील इलेक्ट्रॉनच्या वारंवारितेमुळे रेडिओ तरंग उत्सर्जित होतात. अशा आकाशगंगाचे अवशेष सापडणे दुर्मिळ असते. म्हणूनच अशा प्रकारचे शोध लागले आहेत. यापुढील काळातही भारतीय जीएमआरटी रेडिओ दुर्बीण अनेक शोध लावण्यात यशस्वी होईल, अशी माहिती जीएमआरटीचे वरिष्ठ प्रशासन अधिकारी डॉ. जे. के. सोळंकी यांनी दिली.

Last Updated : Jun 30, 2020, 7:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.